19.4 C
Latur
Monday, October 13, 2025
Homeअंतरराष्ट्रीयफ्रान्समध्ये उलथापालथ : लेकोर्नु आठवड्यात दुस-यांदा पंतप्रधान

फ्रान्समध्ये उलथापालथ : लेकोर्नु आठवड्यात दुस-यांदा पंतप्रधान

पॅरिस : वृत्तसंस्था
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. एका आठवड्यापूर्वी राजीनामा देणारे सेबॅस्टिन लेकोर्नू यांनी पुन्हा फ्रान्सच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. प्रचंड राजकीय गोंधळ आणि अराजकतेच्या काळात राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी लेकोर्नू यांची पुन्हा नियुक्ती केली आहे. यामुळे देशातील राजकीय अस्थिरता आणि सत्ताधारी पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत.

लेकोर्नू यांनी एका आठवड्यापूर्वी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन त्यांच्या जागी दुस-याची नियुक्ती करणार होते, परंतु अचानक मॅक्रॉन यांनी लेकोर्नू यांच्याच नावाची घोषणा केली. विशेष म्हणजे, लेकोर्नू यांच्या सेंटर-लेफ्ट गटाला राष्ट्रीय असेंब्लीमध्ये बहुमत नाही. तसेच त्यांना स्वत:च्या पक्षातून तीव्र टीकेचा सामना करावा लागत आहे.

गेल्या वर्षभरात फ्रान्समधील मॅक्रॉन यांचे सरकार वारंवार कोसळत आहे. मॅक्रॉन यांनी वर्षभरात चार पंतप्रधान बदलले आहेत. एकीकडे राजकीय अस्थिरता, दुसरीकडे वाढत्या कर्जामुळे गुंतवणूकदार, बाजारपेठा आणि युरोपियन भागीदार देश चिंतेत आहेत. लेकोर्नूंची पुनर्नियुक्ती ही फ्रान्ससाठी राजकीय स्थैर्य आणि आर्थिक सुधारणा यांचा शेवटचा प्रयत्न म्हणून पाहिली जात आहे. मात्र, बहुमत नसल्याने आणि वाढत्या जनआक्रोशामुळे त्यांचे पंतप्रधानपद किती काळ टिकेल, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR