मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात ‘हलाल’ आणि ‘झटका’ मटणाचा वाद शांत होतो न होतो तोच ‘असली’ आणि ‘नकली’ पनीरचा प्रश्न निर्माण झाला आहे. इतर सणांप्रमाणेच महाराष्ट्रात होळी देखील मोठ्या उत्साहात साजरी केली. आता ऐन सणाच्या तोंडावरच राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने राज्यभरात मोठ्या प्रमाणात बनावट पनीर जप्त करण्याची कारवाई केली असल्याने बनावट पनीरचा मुद्दा विरोधकांकडून मांडण्यात आला.
दरम्यान, अन्न आणि औषध प्रशासनाने शनिवारी (दि. ८) पुण्यात छापेमारी करत तब्बल १ हजार ४०० किलोचा बनावट पनीरसाठा जप्त केला. या कारवाईत प्रशासनाने बनावट पनीर बनवण्यासाठी वापरला जाणारा १३ लाखांचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे. तर, दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यात देखील अन्न आणि औषध प्रशासनाने अशीच कारवाई केली असून, चंद्रपूर जिल्ह्यात
पाचपुते पुढे म्हणाले, माझा तारांकित प्रश्न १० तारखेला स्वीकृत झाला. त्यानंतर एफडीएने पुणे, चंद्रपूर याठिकाणी छापेमारी केली. त्याठिकाणी आर्टिफिशियल पनीर सापडले आहे. दुर्दैवाने अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे तेवढे अधिकारी नाहीत. डेअरी इंडस्ट्रीजमध्ये काही स्वार्थी लोक पारंपरिक पनीर आणि चीज दोन्ही बनवतात. याला आळा घालण्यासाठी कायद्यात तरतूद करावी लागेल. भेसळयुक्त पनीर दिले तर, फक्त मिस ब्रँडिंग एवढीच कारवाई होते. मागे अशा प्रकरणात दोषी आढळणा-यांवर सरकारने जन्मठेपेची शिक्षा करू असे सांगितले होते. पण तसे काहीच झाले नाही.
अॅनालॉग पदार्थाला केंद्र सरकारची परवानगी
अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण नवी दिल्ली म्हणजे केंद्र सरकारनेच अॅनालॉग चीज, अॅनालॉग पनीर या पदार्थांच्या विक्री आणि उत्पादनाकरिता परवानगी दिली आहे. मात्र, त्याकरिता संबंधित आस्थापनाने परवाना घेणे आवश्यक आहे. पारंपरिक पनीर आणि अॅनालॉग पनीर यामधील फरक जाणून घेण्याबाबत लोकांना माहिती देण्यासाठी जनजागृती केली जाते अशी माहिती असल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिली आहे.