सांगली : राज्यातील अपघातांचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाही. सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटल रोडवर मंगळवारी सकाळी दुचाकीवरून महाविद्यालयाकडे निघालेल्या एका विद्यार्थिनीचा अपघातात मृत्यू झाला.
एसटी बसच्या मागच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. शर्वरी राजकुमार कुलकर्णी (वय २१, रा. हरिपूर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. या भीषण अपघातानंतर स्थानिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटल रोडवर बसच्या चाकाखाली येऊन दुचाकीस्वार महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. शहरातील जय मातृभूमी व्यायाम मंडळासमोर साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात एसटीचे मागील चाक तरुणीच्या डोक्यावरून गेल्याने शर्वरी कुलकर्णी या महाविद्यालयीन तरुणीचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला. अपघातात शर्वरी राजकुमार कुलकर्णी या महाविद्यालीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. मयत शर्वरी ही सांगलीतील एका महाविद्यालयात बीसीएचे शिक्षण घेत होती. सकाळी ती नेहमीप्रमाणे महाविद्यालयाकडे जात असताना सिव्हिल रोडवर मुंबई-जमखंडी बसला तिची दुचाकी घासली. यामध्ये मागील चाकखाली सापडून तिचा मृत्यू झाला.