25.8 C
Latur
Friday, June 21, 2024
Homeलातूरबाजारपेठेत भाजीपाल्याच्या दरात तेजी 

बाजारपेठेत भाजीपाल्याच्या दरात तेजी 

लातूर : प्रतिनिधी
एकीकडे खरीप हंगामाची जय्यत तयारी सुरु झाली असतानाच दुसरीकडे शहरातील कृषि उत्पन्न बाजारात भाजीपाल्याची आवक काही प्रमाणात मंदावल्याचे चित्र आहे. परिणामी, कोथिंबीर, गवार, हिरावी मिरची, कांद पात, मेथी अन्य भाजीपाल्याच्या दरात तेजी आली आहे.  शहरातील कृषि उत्पन्न बाजार समिती आवारातील भाजीपाला मार्केटमध्ये दररोज स्थानिक, शेजारी जिल्हयामधून भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. गेल्या काही दिवसापासून भाजीपाल्याची आवक मध्ये काही प्रमाणात घटल्याचे चित्र आहे.  गेल्या काही दिवसांपासून शहरातील बाजार समितीत भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. परिणामी किरकोळ बाजारात दोडके, वागें, शेवगा, अद्रक, मिरचीसह अन्य भाजीपाल्याच्या दरात मात्र वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना भाजीपाला आता परवडेनासा झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील महात्मा फुले बाजारात भाजीपाल्याची आवक मंदावली असल्याने किरकोळ बाजारात मात्र भाव तेजीत असल्याचे चांगलेच परिणाम दिसून येत आहेत. गेल्या आठ दिवसाच्या तुलनेत अपवाद वगळता जवळपास सर्वच भाजीपाल्याचे दर वाढल्याचे पाहावला मिळत आहेत. शहरातील महात्मा फुले कृषि उत्पन्न बाजार समितीत पालेभाज्यांची आवक गेल्या महिन्याभरापासून घटल्याने स्थानीक किरकोळ बाजारात पालेभाज्यांच्या दरातही दुप्पटीने वाढ झाली आहे. यामुळे आता गृहिणींचे बजेट कोलमडत आहे. कृषि उत्पन्न बाजार समितीत भेंडी, गवार, कारले, दोडके, कोबी, फ्लॉवर, वांगे, शेवगा, मेथी, पालक, कोंथिबीर यांची आवक काही प्रमाणात घटल्यामुळे शहरातील किरकोळ बाजारपेठेत चड्या दराने विक्री केली जात आहे.
किरकोळ बाजारातील भाजीपाल्यांचे दर प्रतिकिलो प्रमाणे मिरची ८० ते ९० रुपये किलो, वांगे ७० ते ८० रुपये किलो, गवार ७० ते ८० रुपये किलो, भेंडी ६० ते ७० रुपये किलो, शेवगा १०० ते १२० रुपय किलो, दोडका ८० रुपये किलो, फुळगोबी ५० ते ६० रुपये किलो, शिमला मिरची ७० रुपये किलो, टोमॅटो ४० ते ५० रुपये किलो, काकडी ३० ते ४० रुपये किलो, मेथी ३० रूपये पेंडी, पालक ३० ते ४० रुपये किलो, कोथींबीर १२० ते १४० रुपये किलो, हिरवी मिरची ८० ते ९० रुपये किलो, कांदा ३० ते ४० रुपये किलो, अद्रक १०० ते १२० रुपये किलो, कांदा पात ८० रुपये पेंडी, गाजर ३० रुपये किलो, ल्ािंबू ७० ते ८० रुपये किलो, पत्ताकोबी ४० ते ५० रुपये किलो, लसूण १८० ते २३० रुपये प्रतिकिलोत किरकोळ बाजारात विक्री केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR