लातूर : प्रतिनिधी
गेल्या काहि दिवसापासून शहरातील फळ बाजार समितीत खवखवीत मक्यांच्या कणसाची आवक होत आहे. पावसाळा सुरू झाला असल्याने मक्याच्या कणसांना मागणी वाढली आहे. त्यानुसार शहरातील बाजारात कणसांची आवक वाढत आहे. सध्या किरकोळ बाजारात एक मक्याचे कणीस २० रुपयांना मिळत आहे. तर १०० रूपयांना ६ कणसाची विक्री केली जात आहे.
पावसाळा हा मक्याच्या कणसाचा मुख्य हंगाम आहे. या काळात पांढरा, गावठी मका बाजारात येत असतो. काही वर्षांपासून हा पांढरा गावठी मका शेतातूनच हद्दपार झाला असल्याने बाजारात आता वर्षभर चालणा-या पिवळया मक्याची कणसे अर्थात (स्वीट कॉर्न) पाहायला मिळतात. काहीसा पांढरा असणारा मका हा गावठी कणीस म्हणून ओळखला जातो. हा कणीस केवळ पावसाळयातच पाहायला मिळतो. या काळात त्याला जास्त मागणी असते. सध्या किरकोळ बाजारात एक कणीस २० रुपयांना मिळत आहे. तर १०० रूपयांना ६ कणीस मिळत असल्याने बाजारात कणसे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे.
पावसाळयात मक्याचे कणसे भाजून भुट्टा खाण्याला नागरिकांची पसंती आहे. मात्र भाजलेला भुट्टा विक्रीसाठी शहरात अवघ्या काहि दिवसातच दाखल होण्याची शक्यता व्यापा-यांनी वर्तवली आहे. त्याचबरोबर अवघ्या काहि दिवसात शहरातील नागरीकांना भुट्याचा स्वाद घेता येणार आहे. सध्या बाजारापेठेत नाशिक वरून मक्यांच्या कणसाची आवक होत असून बाजारात दिवसाला कणसाची २० ते ३० गोण्यांची आवक होत आहे.
सध्या बाजारात कणसाला चागल्या प्रतिचा भाव मिळत असून शेतकरी वर्गात समाधान वक्त होत आहे. मात्र सध्या भाहेरील जिह्यातून मक्यांची आवक होत आहे. पूढिल एक ते दोन महिन्यात जिल्ह्यातून आवक होण्यास सुरूवात होईल त्यानंतर मक्यांचे दरात घसरण झाल्यास लातूरकरांना स्व:तात भुट्याचा आनंद मिळणार असल्याचे व्यापा-यांनी सागीतले.