लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकिय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते दि. १४ एप्रिल रोजी सकाळी बाभळगाव येथील वैशालीनगर मौलाना वस्तीतील आमदार निधीतुन तयार करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यासह विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले.
माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते बाभळगांवमधील गणेश मंदिर जवळील दत्ता जाधव ते साहेबराव मस्के यांच्या घरापर्यंतच्या सिमेंट काँक्रीट रस्ता, बाभळगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या सोलार प्रकल्पाचे लोकार्पण, ऑनलाईन करप्रणाली व नागरी सुविधा संकेत स्थळाचे उद्घाटन करण्यात आले. सोमवारी सकाळी बाभळगाव ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन तेथे नव्याने उभारण्यात आलेल्या सोलार प्रकल्पाचे लोकार्पण तसेच ऑनलाईन करप्रणाली व नागरी सुविधा संकेत स्थळाचा शुभारंभ केला.
यानंतर गावातील गणेश मंदिर जवळील दत्ता जाधव यांचे घर ते साहेबराव मस्के यांच्या घरापर्यंतच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे लोकार्पणही करण्यात आले. तसेच वैशालीनगरमधील मौलाना वस्तीमध्ये आमदार स्थानिक विकास निधीमधून
बांधण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष समद पटेल, ट्वेंटीवन शुगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, बाभळगावच्या सरपंच श्रीमती प्रिया मस्के, उपसरपंच गोविंद देशमुख, ग्रामसेवक शंकर भोसले, सचिन मस्के, राम स्वामी, अनिल मरके, जहांगीर सय्यद, मौलाना हाफीज शकूरसाब, मौलाना इनामसाब, मौलाना मुफ्तीअली, मौलाना रियाजसाब, मुजाहिदसाब, शबीर शेख, उमाकांत मस्के, जहांगीर पठाण, भरत सावळे, वसंत मस्के, सुजित सलगरे आदिसह बाभळगाव ग्रामपंचायतचे सदस्य, नागरिक काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.