34.4 C
Latur
Monday, April 7, 2025
Homeमहाराष्ट्रबायको, सासूला जिवंत जाळत आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

बायको, सासूला जिवंत जाळत आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

घटनेतील तिघांचीही प्रकृती गंभीर

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारी घटनांनी कळस गाठला आहे. हत्या, मारामारी, अत्याचाराच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. एकीकडे पुण्यातील पत्नीने पतीला संपवल्याची घटना ताजी असतानाच आता नाशिकच्या सिन्नरमधून एक भयंकर घटना समोर आली असून पतीने पत्नी अन् सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नव-याने बायको आणि सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सोनारी येथे घडली आहे. केदार हंडोरे असे आरोपीचे नाव असून या घटनेत पत्नी स्रेहल शिंदे आणि सासू अनिता शिंदे गंभीर जखमी झाल्यात. या घटनेत आरोपीने आधी स्वत: ला पेटवून घेतल्याने तो सुद्धा यात गंभीर जखमी झाला.

आरोपी मध्यरात्री घरात घुसला अन् त्याने ज्वलनशील पदार्थ टाकत घर पेटवून दिले. यामध्ये आरोपी पती, बायको आणि सासू तिघेही गंभीर जखमी झालेत. पतीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू तर बायको आणि सासूवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे नव-याने स्वत: पेटवून घेत आमच्या अंगावर येऊन झोपल्याचा खुलासा आरोपीची पत्नी स्रेहल शिंदेने केला आहे. दरम्यान, या भयंकर घटनेत स्रेहल शिंदे ५० टक्के तर सासू अनिता शिंदे ६५टक्के भाजली आहे. घटनेतील तिघांचीही प्रकृती गंभीर असून सध्या तिघांवरही उपचार सुरु आहेत. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR