21.3 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeलातूरबाल गोपाळांच्या साकारलेल्या सीता-रामांनी वेधले लक्ष

बाल गोपाळांच्या साकारलेल्या सीता-रामांनी वेधले लक्ष

लातूर : प्रतिनिधी
अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सेमवार दि. २२ जानेवारी रोजी संपन्न झाली. यानिमित्त लातूर शहरात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते प्रभू श्रीरामांच्या प्रतिष्ठापना व शोभा यात्रेत मंदिरात अनेक बालगोपाळांनी प्रभू श्रीराम, सितामाई, लक्ष्मण, हनुमान साकारले होते. ते प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत होते. अनेकांनी त्यांचेच चरण स्पर्शकरून प्रभू श्रीराम, सितामाई, लक्ष्मण हनुमानांच्या दर्शनाची अनभुती घेतली.
अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सेमवार दि. २२ जानेवारी रोजी संपन्न झाली. यानिमित्त लातूर शहरात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शेकडो वर्षानंतर होणा-या श्रीराम मूर्ती स्थापना कार्यक्रमाचा उत्साह सर्वत्र ओसंडून वाहते. यानिमित्त लातूर शहर व जिल्ह्यात विविध संघटनांकडून विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. प्रभू श्रीरामचंद्र मुर्ती स्थापनेनिमित्त शहरातील विविध मंदिरांमध्ये सायंकाळी दीपोत्सव व आतिषबाजी सोहळा ही पार पडला. या सर्व कार्यक्रमात सर्वांचेच लक्ष वेधले ते बालगोपाळांनी साकारलेल्या  प्रभू श्रीराम, सितामाई, लक्ष्मण, हनुमान यांनी. अनेकांनी तर प्रभू श्रीराम, सितामाई, लक्ष्मण, हनुमान साकारलेल्या बालगोपाळांचे चरण स्पर्श करून प्रभू श्रीराम, सितामाई, लक्ष्मण, हनुमान यांच्या प्रत्यक्ष दर्शनाची अनभुती घेतली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR