24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूर‘बाळा जरा जपून...’चर्चासत्राला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद 

‘बाळा जरा जपून…’चर्चासत्राला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद 

लातूर : प्रतिनिधी
स्त्री रोग संघटनेच्या दुस-या राष्ट्रीय परिषदेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘बाळा जरा जपून…’ या विषयावरील चर्चासत्राचा तीन हजारहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थीनींनी लाभ घेतला.  दयानंद सभागृहात झालेल्या या चर्चासत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व समुपदेशन करण्यासाठी यवतमाळचे डॉ. गिरीश माने, डॉ. वृषाली माने उपस्थित होते.
 यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार धर्मराज हल्लाळे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी स्त्री रोग संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. कल्याण बरमदे, संयोजन समितीच्या अध्यक्षा डॉ. स्वाती गोरे, सचिव डॉ. रचना जाजू, डॉ. राखी सारडा,डॉ. जाकिरा  केळगावकर, लातूर स्त्री रोग संघटनेच्या अध्यक्षा डॉ. प्रतिमा पाटील, सचिव डॉ. मनिषा बरमदे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. तारुण्याच्या उंबरठ्यावर आपल्या भावी आयुष्याचे भविष्य अवलंबून असते. शारीरिक आणि मानसिक बदलांचा प्रभाव तरुणाईला अंतर्बा  ढवळून काढतो.  या लाटांपासून आपले संरक्षण कसे करावे याबाबतीत डॉ. गिरीश माने, डॉ. वृशाली माने यांनी विद्यार्थी – विद्यार्थीनींना समजेल अशा सहज, सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. या चर्चासत्रात लातूर शहर व परिसरातील दहा ते बारा शाळांमधील १ हजार ४०० हून अधिक विद्यार्थी, विद्यार्थीनी, १०० हून अधिक शिक्षक, शिक्षिकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. तर  दीड हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यु-ट्युब, फेसबुकच्या माध्यमातून चर्चासत्राचा लाभ घेतला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR