बाळूमामांचा अवतार भासवणा-या मनोहर भोसलेविरुध्द गुन्हा दाखल

सोलापूर : प्रतिनिधी
काळी जादू, लैंगिक शोषणासह फसवणुकीचे गंभीर गुन्हे असलेल्या भोंदू मनोहर मामा भोसले याला चौकशीसाठी कुर्डुवाडी पोलिस ठाण्याच्या पथकाने शुक्रवारी (२४ एप्रिल) दुपारी पुण्यात मांजरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून पुन्हा अटक केली आहे. मनोहर भोसले याने बांधकाम व्यापारी गौतम कसबे (रा. सोलापूर) यांना धंद्यात प्रगती करण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली. त्यातील ५० हजार रुपये स्वीकारून आपली फसवणूक केल्याची तक्रार पोलिसांकडे प्राप्त झाली.

त्यानुसार कुर्डुवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अतुल मोहिते त्यांच्या पथकासह पुण्याला रवाना झाले होते. शुक्रवारी (दि. २४) पुण्यातील मांजरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुपारी २ च्या सुमारास मनोहर भोसलेसह (रा. उंदरगाव, ता. करमाळा) त्याचा साथीदार विशाल वाघमारे (रा. मांजरी) या दोघांना ताब्यात घेऊन सायंकाळी कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात आणण्यात आले.
गौतम कसबे हे रिअल इस्टेट धारक आहेत. आपल्या व्यवसायामध्ये वारंवार येणा-या अपयशामुळे गौतम कसबे हे भोंदू मनोहर भोसले याच्या संपर्कात आले. या दरम्यान मनोहर याने पूजा-अर्चा केल्यास संकटे दूर होतील आणि व्यवसायात प्रगती होईल असे सांगून कसबेंकडे २ लाख रुपयांची मागणी केली. त्यापैकी ५० हजार रुपये त्याला दिले. मात्र, यानंतरही कसबेंच्या व्यवसायात फारशी सुधारणा झाली नाही. अखेर कसबेंनी पोलिस ठाणे गाठून मनोहर भोसले याच्याविरोधात फिर्याद दिली.

संत बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगणा-या करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील भोंदूबाबा मनोहरमामा भोसले याच्याविरुद्ध ९ सप्टेंबर २०२१ मध्ये करमाळा पोलिस ठाण्यात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झाला होता. १९ सप्टेंबर २०२१ रोजी करमाळा न्यायालयाने ७ दिवसांची (२७ सप्टेंबरपर्यंत) पोलिस कोठडी मंजूर केली. घोटीच्या आश्रमातून दर अमावास्या-पौर्णिमेला भविष्य बघायचा, अशी माहिती समोर आली आहे. पुण्यातून अटकेनंतर तो पुन्हा चर्चेत आला आहे.

‘मी संत बाळूमामाचा अवतार’ असल्याचे सांगून कर्करोग बरा करतो असे खोटे सांगत मनोहर भोसले बाभळीचा पाला, साखर, भंडारा विकत घ्यायला लावायचा. २०२१ साली शशिकांत खरात यांची २ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर भोसलेला अटक करम्यात आली होती. त्यानंतर मनोहर भोसलेने आश्रमात साथीदारांसह लैंगिक शोषण केल्याचा आरोप महिलेने केला होता. त्याही प्रकरणात भोसलेला २०२१ मध्ये ताब्यात घेतले होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये कलावंतांचा अनोखा संघर्ष; सूर आणि तालातून न्यायाची हाक
03:09
Video thumbnail
Big Breaking : पिस्तुल्या महाराजाच्या दीड कोटींच्या बंगल्यावर जप्तीची तयारी!
02:12
Video thumbnail
Latur Protest|सोनम वांगचूक प्रकरणाचे लातूरमध्ये पडसाद; गांधी चौकात घोषणाबाजी
06:07
Video thumbnail
Parbhani|राहुल पाटील यांना सईद खानांचे थेट आव्हान; परभणीचे राजकारण तापले
03:39
Video thumbnail
EXCLUSIVE : पाऊस गायब... पिक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा जीवघेणा संघर्ष!
02:20
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38
Video thumbnail
Big Breaking : नीट पेपरफुटी प्रकरणात CBI पुन्हा लातुरात; तपासाला वेग!
03:15
Video thumbnail
Latur|पावसासाठी वडवळ नागनाथमध्ये शेकडोंचे नवनाथ पारायण
05:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाअभावी खरीप हंगाम संकटात
02:56
Video thumbnail
Latur|रेणापूरमधील बेकरीवर FDA चा छापा; परवाना जागेवरच रद्द
00:56
Video thumbnail
Solapur|धक्कादायक! सोलापूरच्या जलवाहिनीला तडा; लाखो लिटर पाणी वाया
01:04
Video thumbnail
Latur|जन्मभूमीतून खासदारांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्या थेट ऐकल्या
04:18

Latest news