20.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमनोरंजन‘बिग बॉस’च्या घरामध्ये दिसणार गुणरत्न सदावर्ते

‘बिग बॉस’च्या घरामध्ये दिसणार गुणरत्न सदावर्ते

मुंबई : ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून ‘बिग बॉस’ हिंदीचा अठरावा सीझन सुरू होत आहे. या सीझनमध्ये प्रसिद्ध विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते हे सहभागी होणार आहेत.

स्वत: सदावर्ते यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. गुणरत्न सदावर्ते यांना ‘बिग बॉस’ हिंदीच्या सहभागाबद्दल विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, आगे आगे देखो होता हैं क्या.. मी कशाचीच काळजी करत नाही आणि कुणालाच घाबरत नाही. माझी लढाई ही लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आहे, असंही ते म्हणाले.

गुणरत्न सदावर्ते हे गुरुवारीच ‘बिग बॉस’च्या घरातील प्रक्रियेसाठी निघाले आहेत. घरातील १८ सदस्यांपैकी ते एक असणार आहेत. सदावर्ते घरामध्ये कसे वावरतात, इतर सदस्यांसोबत ते कसे जुळवून घेतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

सदावर्ते म्हणाले की, ‘बिग बॉस’च्या घरामध्ये कुठलीही लढाई किंवा तंटे होणार नाहीत. कुठल्याही चुकीच्या गोष्टी होणार नाहीत, हे मी सांगतो. चांगली माणसं ही चांगल्या माणसांना शोधत असतात, त्यामुळे ‘बिग बॉस’ने मला शोधले आहे. घरातल्या इतर सदस्यांसोबत माझं भावाचं नातं राहणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR