चाकूर : प्रतिनिधी
येथील सीमा सुरक्षा दलाच्या सहायक प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतलेले बीएसएफचे ३५२ जवान देश सेवेसाठी दि २६ ऑक्टोबंर रोजी सज्ज झाले असून प्रशिक्षण घेतलेल्या जवानांचा दीक्षांत समारंभ महानिरीक्षक विनीत कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज परेड ग्राऊंडवर झाला.
येथील सीमा सुरक्षा दलाच्या सहायक प्रशिक्षण केंद्रात ३५२ प्रशिक्षणार्थीचे ंिद ११ ंिडसेबर २०२३ ते २६ आक्टोबर २०२४ पर्यंत ४४ आठवड्याचे खडतर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शनिवारी ंिद २६ आक्टोबर २०२४ रोजी त्यांना दीक्षांत समारंभात देशसेवेची शपथ देण्यात आली. यावेळी सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक विनीत कुमार यांना प्रशिक्षीत बैच संख्यां १८६ आणि बैच संख्यां १८७ मधील ३५२ जवानांनी मानवंदना दिली. यावेळी समादेष्टा मदनपाल सिंह उपस्थित होते. दीक्षांत समारंभात देशातील हरियाणा, राजस्थान आणि बिहार या राज्यातून प्रशिक्षणासाठी निवड झालेले जवान सहभागी झाले होते. या शानदार दीक्षान्त शपथग्रहण सोहळ्याच्या परेडचे नेतृत्व प्रशिक्षणार्थी भानू चौधरी यांनी केले. या प्रशिक्षण कालावधीत सर्वश्रेष्ठ कामगीरी करणा-या प्रशिक्षणार्थी जवानांमध्ये बैच संख्यां १८६ मधून ऑल ओवर फर्स्ट चे गोल्ड मेडल (सुवर्णपदक) प्रशिक्षणार्थी जवान राहूल स्वामी तसेच बैच संख्यां १८७ चे ऑल ओवर फर्स्टचे गोल्ड मेडल प्रशिक्षणार्थी जवान (सुवर्णपदक) अंकित कुमार यांनी पटकाविले. त्यांना महानिरीक्षक विनीत कुमार यांनी गोल्ड मेडल देऊन सन्मानित केले.
प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये जवानांना मूलभूत प्रशिक्षणासोबत शारीरीक दक्षता, शस्त्रविद्या, गोळाबारूद, फील्ड क्राफ्ट, नकाशा वाचन, फिल्ड इंजिनियंिरग यासारख्या प्रशिक्षणाबरोबर आंतरिक सुरक्षा कर्तव्य, सीमा प्रबंधन, कायदे व मानवाधिकार यांचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी दीक्षान्त समारंभानंतर सांस्कृतिक कार्यक्रमात देशभक्तीपर विविध प्रेरणा गीते सादर करण्यात आली तसेच मलखांब सह विविध चित्तथरारक कसरती सादर
केल्या. यावेळी या दिक्षान्त समारंभास जवानाच्या माता-पित्यासह बीएसएफचे अधिकारी,जवान उपस्थित होते.