27.6 C
Latur
Friday, June 13, 2025
Homeमहाराष्ट्रबीडची ‘सोनम’! पतीचं अपहरण; हात-पाय मोडले, माहेरच्यांची साथ

बीडची ‘सोनम’! पतीचं अपहरण; हात-पाय मोडले, माहेरच्यांची साथ

 

बीड : प्रतिनिधी
एकीकडे सासरच्यांच्या छळाला कंटाळून सूना आत्महत्या करण्याच्या बातम्या सातत्याने कानावर पडत असताना बीडमध्ये मात्र या उलट प्रकार घलला. पती पत्नीचा वाद विकोपाला केला आणि नंतर पत्नीने माहेरच्या मंडळींना बोलावून पतीला बेदम चोपलं. त्यामध्ये पतीचा दोन्ही पाय आणि हात मोडले. रामहरी मोरे असं पतीचं नाव असून अनुसया काकडे असं पत्नीचं नाव आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलिस स्थानकात पत्नीसह चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीडच्या ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे. पत्नीने माहेरच्या मंडळींना बोलावून पतीचे अपहरण केले आणि त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत पतीचे दोन्ही पाय आणि एक हात फ्रॅक्चर झाला. रामहरी मोरे याचा विवाह मागील वर्षी अनुसया काकडे हिच्यासोबत झाला होता. परंतु घरगुती कारणावरून दोघांचे सातत्याने भांडण होत होते. त्यामुळे हे पती-पत्नी विभक्त राहत होते. अशातच रामहरी मोरे आपले सामान घेण्यासाठी पत्नीच्या घरी गेला असता या दोघांचे पुन्हा भांडण झाले.

भांडणाचा वाद विकोपाला जात असल्याचे लक्षात येताच रामहरी मोरे यांनी घरातून काढता पाय घेतला आणि ते आपल्या गावी निघाले. मात्र त्याच वेळी पत्नीने तिच्या माहेरच्यांना बोलावून घेतलं. तिच्या माहेरच्या मंडळींनी रामहरी मोरेचे रस्त्यावरुन अपहरण केलं आणि त्याला बेदम मारहाण केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR