26.6 C
Latur
Wednesday, March 4, 2026
Homeमहाराष्ट्रबीड जिल्ह्यात ऑनलाईन सट्टा

बीड जिल्ह्यात ऑनलाईन सट्टा

सट्टेबाजीतून लाखोंची उलाढाल, पोलिसांचा जंगलात छापा
बीड : प्रतिनिधी
नेकनूरपासून अवघ्या ११ कि. मी. अंतरावर असलेल्या कारेगव्हाणमध्ये लाखो रुपयांची उलाढाल करणारा ऑनलाईन सट्टा सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिका-यांना झाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशावरून बीड मुख्यालयातील २ पोलिसांनी मध्यरात्री एक ते दोन वाजण्याच्या सुमारास कारेगव्हाण परिसरात छापा मारला असता लोटस ऑनलाईन गेमद्वारे सट्टा सुरू असल्याचे उघडकीस आले. यावेळी १५ मोबाईलसह बार लॅपटॉप जप्त करत चौघा जणांना जेरबंद केले.

मोबाईल आणि लॅपटॉपच्या प्राथमिक तपासणीत या सर्व खेळात कोट्यवधी रुपयांचे बेकायदेशीर आर्थिक व्यवहार झाल्याचे सांगण्यात येते. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया नेकनूर पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत सुरू होती. ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात सट्टा खेळला जात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मध्यरात्री जंगलात
पोलिसांचा छापा
गेल्या काही महिन्यांपासून कारेगव्हाण परिसरात लोटस ऑनलाईन गेमच्या माध्यमातून सट्टा चालवला जात होता. याची माहिती बीड मुख्यालयाच्या दोन पोलिसांना झाली. त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिका-यांना याची माहिती देत मध्यरात्री कारेगव्हाण परिसरातील जंगलसदृश ठिकाणी एका कोपीत छापा मारला. त्यावेळी कंधारे नावाचे तीन आणि खिल्लारे नावाचा एक असे चौघे त्याठिकाणी महादेव अ‍ॅप लोटसद्वारे ऑनलाईन सट्टा चालवत होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR