मुंबई : लेजेंडरी गायक आणि संगीतकार आरडी बर्मन यांच्या जीवनावर आधारित बायोपिक मोठ्या प्रमाणावर बनत आहे. हा भारतातील सर्वात चर्चेत असलेल्या आगामी चित्रपटांपैकी एक आहे, ज्याची निर्मिती कमल जैन करत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन नीरज पांडे करणार आहेत.
आरडी बर्मन यांच्या बायोपिकचे निर्माते हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर, भारतात यापूर्वी कधीही न पाहिलेल्या सिनेमॅटिक अनुभवाच्या रूपात बनवण्याची योजना आखत आहेत. हा बायोपिक आधीच भारतातून येणा-या सर्वात बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक म्हणून चर्चेत आहे आणि हे स्वाभाविकच आहे, संगीत जगणा-या देशात, महान दिग्गज आरडी बर्मन यांचे असाधारण जीवन आणि वारसा मोठ्या पडद्यावर आणण्यापेक्षा मोठा विषय दुसरा कोणताही असू शकत नाही.
चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक नीरज पांडे त्यांच्या ए वेन्सडे, बेबी, स्पेशल आणि ब्लॉकबस्टर बायोपिक एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी यांसारख्या प्रशंसित चित्रपटांसाठी ओळखले जातात. निर्माते कमल जैन यांनी अलीकडेच अत्यंत यशस्वी पीरियड ड्रामा मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसीची निर्मिती केली होती, ज्यात कंगना रनौत मुख्य भूमिकेत होती.

