बुलेटच्या फटाका आवाजामुळे नागरिकांना धडकी

परभणी : शहरात सध्या काही सैराट युवकांकडून बुलेट मोटारसायकलच्या सायलेंसरमध्ये बदल करण्यात येत आहेत. त्यामुळे बुलेटच्या सायलेंसरमधून मोठ्या आवाजात फटाके फोडल्याप्रमाणे आवाज येत आहेत. या आवाजामुळे नागरिक दचकत असून त्यांना या आवाजाच्या धडकीने भीती निर्माण झाली आहे. विशेषत: रात्री उशिरापर्यंत हा प्रकार शहरातील मुख्य रस्त्यासह गल्ली, बोळात सुरू असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे पोलिस विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन संबंधीत बुलेट चालकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

शहरातील मुख्य रस्ते, चौक तसेच गर्दीच्या ठिकाणी काही युवक मुद्दाम सायलेंसरमध्ये बदल करून कानठळ्या बसवणा-या फटाक्याचे आवाज काढत आहेत. अचानक मोठ्याने होणा-या या आवाजामुळे नागरिक दचकत असून त्यांना धडकी भरत आहे. यामुळे रस्त्यावरून जाणा-या इतर दुचाकी चालकही सैरभैर होऊन अपघाताच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभुमीवर शहर वाहतूक शाखा पोलिसांनी अशा सैराट बुलेट चालकांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

शहरातील वाहतूक शाखा पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी बुलेटच्या सायलेंसरमध्ये बदल करणा-या बुलेट चालकांना पकडले होते. या बुलेट चालकांच्या बुलेटचे सायलेंसर काढून ते नष्ट करण्याची कारवाई करण्यात आली होती. परंतू शहरात सद्यस्थितीत काही बुलेट चालक सैराटपणे रस्त्यावरून धावत बुलेटच्या सायलेंसरमधून फटाका आवाज काढत असल्याचे दृष्य पुन्हा पहावयास मिळत आहे. वाहतूक शाखा पोलिसांनी या विरोधात विशेष मोहीम राबवून वाहतूक नियमभंग करणा-यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
मास्टर ब्लास्टरचा पाककौशल्य 'सिक्सर'; सचिन तेंडुलकरने बनवले खास उकडीचे मोदक
00:40
Video thumbnail
थिएटरच्या स्क्रीनमधून थेट स्कॉर्पिओ बाहेर! व्हिडिओ पाहून प्रेक्षकांची धांदल
00:18
Video thumbnail
अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याची दृश्ये कॅमेऱ्यात कैद; पहा 'क्लिअर' व्हिडिओ
00:30
Video thumbnail
मराठा आरक्षण आंदोलन; सरकारच्या सकारात्मक भूमिकेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतले उपोषण
00:56
Video thumbnail
Manoj Jaramge Andolan|मनोज जरांगेंच्या आंदोलनाचे पडसाद; लातुरात मराठा समाजाचा रास्ता रोको
01:35
Video thumbnail
Latur|जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प मिळून फक्त 32 टक्के पाणी साठा;अनेक गावांना तीव्र पाणी टंचाईच्या झळा.
03:04
Video thumbnail
Latur|डिझेल संपलं! लातूर जिल्ह्यात इंधन टंचाईचे सावट
02:29
Video thumbnail
Latur|NEET पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरच्या आर्थिक व्यवहारांचा CBI तपास...
04:33
Video thumbnail
Latur|माजी आमदार धिरज देशमुखांच्या पुढाकाराने कॅनॉलला पाणी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा
02:35
Video thumbnail
साकोळ येथे बकरी ईदनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन; मुस्लीम बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
05:42
Video thumbnail
‘हिल हिल पोरी हिला’ वर डॅनी पंडित आणि धनश्री वर्माचा धमाका! पाहा भन्नाट डान्स रील.
00:58
Video thumbnail
नांदेडमध्ये काँग्रेसचा इंधन दरवाढीविरोधात हल्लाबोल;बैलगाडीतून दुचाकी नेत काँग्रेसचं अनोखं आंदोलन
02:09
Video thumbnail
Himayatnagar|नगराध्यक्ष उतरले थेट श्रमदानात!;हिमायतनगरच्या पाणीप्रश्नावर तोडगा
01:37
Video thumbnail
Latur\खंडापूर सप्ताहातील दानरक्कम घेऊन महाराज गायब?;“किशोर महाराजांना अटक करा” ; वारकऱ्यांचा आक्रोश
02:52
Video thumbnail
Latur|लातुरात शिवसेनेचा शक्तिप्रदर्शन मेळावा; २५ हजार कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
07:20

Latest news