नीट परीक्षेच्या चिंतेतून १८ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या; गंगाखेड परिसरात हळहळ

गंगाखेड: नांदेड येथे ‘नीट’ (NEET) परीक्षेची तयारी करणाऱ्या एका १८ वर्षीय विद्यार्थ्याने परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या चिंतेतून विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. प्रथमेश मोहन राठोड (वय १८, रा. गोदावरी तांडा) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रथमेश नांदेड येथे राहून नीट परीक्षेची तयारी करत होता. चार दिवसांपूर्वीच तो सुटीसाठी आपल्या मूळ गावी, गोदावरी तांडा येथे आला होता. २७ मे रोजी रात्री घरातील सर्वजण जेवण करून झोपले असता, २८ मे रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास प्रथमेशला उलट्या होत असल्याचे त्याच्या आईच्या निदर्शनास आले.

उपचारादरम्यान मृत्यू
मुलाची प्रकृती खालावल्याचे पाहून कुटुंबीयांनी त्याला तातडीने गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर प्रथमेशला मृत घोषित केले.

परीक्षेच्या तणावामुळे उचलले टोकाचे पाऊल
मृत्यूच्या काही काळ आधी आईने विचारपूस केली असता, “मी नीट परीक्षा उत्तीर्ण होईन की नाही,” या चिंतेमुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्रथमेशने सांगितले होते. या घटनेबाबत विनायक राठोड यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात माहिती दिली असून, त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

सेविका, मदतनिस होणार बडतर्फ 

लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा संप...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
नांदेडमध्ये काँग्रेसचा इंधन दरवाढीविरोधात हल्लाबोल;बैलगाडीतून दुचाकी नेत काँग्रेसचं अनोखं आंदोलन
02:09
Video thumbnail
Himayatnagar|नगराध्यक्ष उतरले थेट श्रमदानात!;हिमायतनगरच्या पाणीप्रश्नावर तोडगा
01:37
Video thumbnail
Latur\खंडापूर सप्ताहातील दानरक्कम घेऊन महाराज गायब?;“किशोर महाराजांना अटक करा” ; वारकऱ्यांचा आक्रोश
02:52
Video thumbnail
Latur|लातुरात शिवसेनेचा शक्तिप्रदर्शन मेळावा; २५ हजार कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
07:20
Video thumbnail
घरच्या घरी श्रद्धा कपूरचा फ्री-स्टाईल डान्स; 'त्या' एका टॅगमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण!
00:43
Video thumbnail
समृद्धी महामार्गावर ईव्ही कारला भीषण आग; काही मिनिटांतच गाडी जळून खाक.
00:30
Video thumbnail
Latur|गावठी पिस्तुलासह आरोपी अटकेत!;MIDC पोलिसांची धडक कारवाई
02:16
Video thumbnail
Latur|आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते नूतन शराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष पदग्रहण सोहळा संपन्न.
06:06
Video thumbnail
REEL STAR|रील्स बनवणारी तरुणी निघाली चोर?एलसीबीची मोठी कारवाई
02:19
Video thumbnail
BIG BREAKING|खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्याचा अपघात;चार गाड्या एकमेकांवर आदळल्या
00:58
Video thumbnail
Latur|NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ची आणखी एक मोठी कारवाई;शिवराज मोटेगावकर यांचे बँक लॉकर सील
03:00
Video thumbnail
nanded|आमदार चिखलीकरांनी मध्यरात्री घेतली खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट
04:20
Video thumbnail
Nanded|श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय: नांदेडमध्ये शिवसैनिकांची गर्दी!
03:40
Video thumbnail
जळकोट तालुक्यात डिझेलचा तीव्र तुटवडा; पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबल्याने शेतकरी हवालदिल
02:12
Video thumbnail
Shivraj Motegavkar|खोपेगाव शिवारातील कोटींची इमारत चर्चेत;प्रशासनाच्या परवानगीवर प्रश्नचिन्ह?
02:39

Latest news