निलंगा : प्रतिनिधी
तालुक्यातील बोरसुरी येथील शेतकरी सुमनबाई बाबुराव सूर्यवंशी व ताडमुगळी येथील गुंडेराव माधवराव गवंडगावे यांनी सोयाबीनची गंज करुन ठेवली असता अज्ञात व्यक्तीने सदरील गंजीस आग लावल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
निलंगा तालुक्यातील बोरसुरी येथील महिला शेतकरी सुमनबाई बाबुराव सूर्यवंशी व येथील ताडमुगळी येथील गुंडेराव बाबुराव गवंडगावे या शेतक-याने सोयाबीनची काढणी करून शेतात बनीम मारून ठेवलेल्या गंजीला अज्ञात इसमाने आग लावल्याने त्यात त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची तलाठी ज्ञानोबा लहाने, कृषी सहाय्यक शेख यांनी पंचनामा केला. यावेळी सरपंच गणपत पाटे, गोविंद पाटील, चंद्रशेखर चिलमे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते .
घटनेनंतर डॉ. अरविंद भातांब्रे यांनी ताडमुगळी येथील महिला शेतकरी सूर्यवंशी यांच्या शेतात घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानाची पाहणी केली. ही घटना मन सुन्न करणारी असल्याने काँग्रेस डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ अरविंद भातांबरे यांनी सांगितले तसेच शेतकरी महिलेस आर्थिक मदत केली. यावेळी औराद महसूल मंडळ निरीक्षक अॅड.संदीप मोरे पाटील, बालाजी सावरे, दत्तात्रय माने, व्यंकट पाटे, तुषार माकणे, धोंडीराम रोडे, डॉ.अरविंद व्यजने, जोतिराम कोलपूके, प्रशांत उगिले, मठपती, परमेश्वर उगिले, दिगंबर सूर्यवंशी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.