26.9 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeअंतरराष्ट्रीयब्राझीलमध्ये एक्सवर बंदी; मस्कला धक्का

ब्राझीलमध्ये एक्सवर बंदी; मस्कला धक्का

नवी दिल्ली : ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने काल एलॉन मस्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर देशात बंदी घातली आहे. यासोबतच ब्राझीलमध्ये युजर्स एक्सचा वापर करताना आढळल्यास त्यांच्याकडून ७ लाखांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. हा निर्णय देशातील लीक झालेल्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग आहे, तर दुसरीकडे मस्क यांनी न्यायाधीश अलेक्झांडर डी मोरेस यांचा हा निर्णय राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोप केला आहे. भाषणस्वातंत्र्य ही लोकशाहीची देणगी आहे मात्र, ब्राझीलमध्ये एक न निवडलेले न्यायाधीश राजकीय हेतूने त्याचा नाश करत आहेत, असा दावाही मस्क यांनी केला.

मिळालेल्या माहितीनुसार, ब्राझीलने मस्क यांना कंपनीसाठी नवीन कायदेशीर प्रतिनिधी नियुक्त करण्याचा आदेश दिला होता मात्र मस्कने हा आदेश फेटाळून लावला. एक्सवर चुकीची माहिती आणि बनावट बातम्या पसरवल्या जात होत्या असा आरोप आहे. विशेषत: २०२२ मधील ब्राझीलच्या निवडणुकांदरम्यान मोरेसचा असा विश्वास आहे की एक्सचा वापर राजकीय हेतूसाठी केला जात आहे.

या कारणास्तव, गुगल, अ‍ॅपल आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरसह मोठ्या टेक कंपन्यांना तांत्रिक बंदी लादण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जे युजर्सना एक्स अ‍ॅप्लिकेशन्स आणि वेबसाईट्समध्ये प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करतील. यामध्ये त्यांच्या स्टोअरमधून एक्स अ‍ॅप काढून टाकणे आणि ब्राझिलियन इंटरनेट नेटवर्कवरील वेबसाईट ब्लॉक करणे यासारख्या अ‍ॅक्टिव्हिटीजचा समावेश आहे. दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयाचा फटका ब्राझीलमधील २२ दशलक्षाहून अधिक युजर्सला बसणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR