33.2 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeलातूरभाजपाच्या काळात महिला सुरक्षा धोक्यात

भाजपाच्या काळात महिला सुरक्षा धोक्यात

लातूर : प्रतिनिधी
सन २०१९ नंतर आजपर्यंत म्हणजेच गेल्या १० वर्षांत देशातील महिला सुरक्षा धोक्यात आली आहे. महिलांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. देशात असो की राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही. हा भाजपाच्या धोरणाचा परिणाम असून महिला सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी महिला मतदारांनी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांचा प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन विलास  सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी केले.
लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ दि. १ मे रोजी सकाळी लातूर तालुक्यातील सिरसी येथे रामराजा जाधव यांच्या निवासस्थानी झालेल्या महिला मेळाव्यात श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख बोलत होत्या. या वेळी गावच्या सरपंच कौशल्य कांबळे, सुनीता अरळीकर, दैवशाला राजमाने, सीमा क्षीरसागर, रामराजे जाधव, बाळासाहेब पाटील, आत्माराम जाधव, विवेकानंद हाळे, तुकाराम शिंदे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना वैशालीताई देशमुख म्हणाल्या, देशाचे भवितव्य घडविणारी ही निवडणूक आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून उत्तम, कार्यक्षम, शिक्षित प्रतिनिधी निवडून संसदेत पाठविणे महत्त्वाचे असते. काँग्रेस महाविकास आघाडीने डॉ. शिवाजी काळगे यांच्या रुपाने उत्तम उमेदवार दिला आहे. मतदारांनी आपले बहुमूल्य मत डॉ. काळगे यांचा देऊन काँग्रेस महाविकास आघाडीला विजयी करावे, असे आवाहन केले.
या वेळी दैवशाला राजमाने सीमा क्षीरसागर सुनीता आरळीकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी मुक्ताबाई भोसले, सुमित्रा डोरले, पद्मिणी सुरवसे, अयोध्या जाधव, गीता जाधव, सुरेखा कदम,  सुरेखा जाधव, प्रेमा जाधव, वंदना जाधव, छाया जाधव, सविता जाधव,  राजाबाई जाधव, चंद्रकला जाधव, ज्योती जाधव, सहदेव मस्के, बालाजी पाटील, उद्धव जाधव, अण्णाराव कांबळे, बाळू भोसले, भागवत कदम, महादेव गोजमगुंडे, चिमा लस्कर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभार सहदेव मस्के यांनी मानले.
सायंकाळी आखरवाई येथे महिला मेळावा झाला. या मेळाव्यास विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, सरपंच संतोष तिगिले, अनंत बारबाले, सत्यभामा खोचरे, लक्ष्मीबाई मठपती, गोविंद बोराडे, विरसेन भोसले, गंगा ठेकाळे, राधा कदम, अनिता कदम, सुनीता काळे, रोशनबी मुजावर, यशोदा मुळे, सुरेखा बारबोले, यशोदा बारबोले, जानकाबाई गिराम, चंद्रकला स्वामी, पारबतबाई बोवलगे, सारजाबाई सोनवणे, अनुसया
लोखंडे, बालासाहेब गुले, विनोद खोचरे, शिवराज बारबोले, शिवलिंग गिराणे आदी मान्यवर उपस्थित होते.  सूत्रसंचालन मंगेश स्वामी यांनी केले. प्रास्ताविक अनंत बारबोले यांनी केले तर समाधान बारबोले यांनी आभार मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR