27.5 C
Latur
Wednesday, February 19, 2025
Homeअंतरराष्ट्रीयभारत-चीन सीमावाद : ट्रम्पची मध्यस्थी मोदींनी धुडकावली

भारत-चीन सीमावाद : ट्रम्पची मध्यस्थी मोदींनी धुडकावली

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात भारत-अमेरिकेशी संबंधित अनेक विषयांवर चर्चा झाली. दोन्ही देशातील व्यापार दुप्पट करण्यावर भर देतानाच इतर क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली. याच बैठकीत अध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींसमोर भारत-चीन सीमावाद प्रश्नी मध्यस्थीचा प्रस्ताव ठेवला, ज्याला भारताने नकार दिला.

वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये ट्रम्प यांनी चीनसंदर्भातील प्रस्ताव ठेवला. मी भारताकडे बघतो. भारत-चीन सीमेवर भयंकर चकमकी बघायला मिळतात आणि मला असे वाटते की असेच चालत राहील. हे सगळे थांबवण्यासाठी जर मी काही मदत करू शकलो, तर मला खूप आनंद होईल. हे खूप काळापासून चालू आहे, जे खूपच हिंसक आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचा हा प्रस्ताव भारताने फेटाळून लावला. भारताचे परराष्ट्र व्यवहार सचिव विक्रम मिस्त्री यांनी सांगितले की, यासंदर्भात भारताची भूमिका द्विपक्षीयच राहिलेली आहे. आमचे कोणत्याही शेजारी राष्ट्रासोबत जे काही मुद्दे आहेत, ते आम्ही द्विपक्षीय चर्चेतून सोडवू, असे विक्रम मिस्त्री यांनी स्पष्ट केले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन आणि रशियातील युद्ध थांबवण्यासाठी पुढाकार घेतला. त्याचबरोबर गाझा पट्टीत सुरू असलेला इस्रायल-हमास संघर्ष थांबवण्यातही मध्यस्थी केली आहे. त्यानंतर आता ट्रम्प यांनी भारत-चीन सीमावादात मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR