40 C
Latur
Tuesday, April 22, 2025
Homeराष्ट्रीयभीषण अपघातात कुटुंबातील ८ ठार

भीषण अपघातात कुटुंबातील ८ ठार

दमोह : मध्य प्रदेशच्या दमोह जिल्ह्यात मंगळवारी भीषण अपघात झाला आहे. कार नदीत कोसळून एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघातात ५ जण जखमी झाले आहेत. अपघाताची भीषण दुर्घटना मंगळवारी सकाळी अकरा वाजता नोहटा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सिमरी गावात घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात दाखल केले. बांदकपूर येथून देवदर्शन करून जबलपूरला परतताना अपघाताची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या दमोह जिल्ह्यातील नोहटा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील बनवार चौकी महादेव घाट पुलाजवळ एक कार अनियंत्रित होऊन नदीत कोसळली. भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू झाला आहे. जबलपूरच्या भीटा फुलर गावातील संपूर्ण कुटुंब होते.

संपूर्ण कुटुंब बांदकपूरच्या जटाशंकर धाम येथून दर्शन करून जबलपूरला परतत होते. पूल ओलांडताना ही दुर्घटना घडली. कारमध्ये एकूण १३ प्रवासी होते. त्यातील ६ लोकांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन लहान मुलांनी दमोह जिल्ह्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान जीव सोडला. भीषण अपघातात ५ जण जखमी झाले आहेत. जखमींना दमोह जिल्ह्यातील रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर जबलपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले.

अपघातात मृत पावलेल्यांचे नातेवाईक गोविंद सिंह यांनी सांगितले की, अपघातात मृत पावलेले लोक एकाच कुटुंबातील होते. सर्व लोक बांदकपूर येथे देवदर्शनासाठी मंगळवारी सकाळी गेले होते. देवदर्शनावरून परतताना कारचा अपघात झाला. बनवारच्या महादेव घाट पुलावरून नदीत कार कोसळून भीषण अपघात झाला.

मृतांची ओळख पटली
मध्य प्रदेशच्या दमोह जिल्ह्यातील सिमरी गावात झालेल्या अपघातातील जखमींची ओळख पटली आहे. रज्जो सिंह(५५), अंकीत, वैभव सिंह (१२), आयुष, रवींद्र (२२) अशी अपघातात जखमी झालेल्या लोकांची नावे आहेत. तर लौग बाई, हल्की बाई, संपत बाई, गुड्डी बाई, बैजंती बाई, रचना, तमन्ना आणि शिब्बू ही अपघातात मृत पावलेल्या लोकांची नावे आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR