भुमरेंच्या ड्रायव्हरच्या नावावर ४ सेकंदात १५० कोटींची जमीन!

संभाजीनगर : प्रतिनिधी
खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला आयकर विभागाने १५० कोटींची जमीन भेट मिळाल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. ही जमीन हैदराबादमधील सालारजंग कुटुंबाच्या वारसांनी त्याला हिबानामा (बक्षिसी) स्वरूपात दिल्याचे सांगितले जात आहे. प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून केली जात आहे. दरम्यान, चौकशीत अद्याप ठोस पुरावा मिळालेला नाही, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.

बोगस नवाबाच्या मदतीने भूमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावे सुमारे साडेआठ एकर जमीन हिबानामा करून देण्यात आली. हा व्यवहार केवळ ५०० रुपयांच्या बॉण्डवर करण्यात आला. इतकेच नव्हे, तर सिटी सर्व्हे कार्यालयात पीआर कार्ड मिळवण्यासाठी अधिका-यांनाही हाताशी धरले गेले. ही संपूर्ण प्रक्रिया रातोरात उरकण्यात आली आणि संबंधित जमिनीची कोणतीही रजिस्ट्री न करता थेट मालकी हस्तांतरित करण्यात आली, असा आरोप इम्तियाज जलील यांनी केला. केवळ चार सेकंदात ६ एकर जागेचा व्यवहार झाला, असा तपशील इम्तियाज जलील यांनी कागदपत्रांद्वारे दिला.

ड्रायव्हर जावेद काय म्हणाले : आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू असतानाच, आता आयकर विभागाने जावेद शेख यांनी नोटीस पाठवली आहे. भूमरे यांचा ड्रायव्हर जावेद शेख मात्र आपल्या जबाबावर ठाम आहे. यावेळी बोलताना शेख म्हणाले की, यात व्यवहार काहीही झालेले नाही. मला काही पैसे मिळाले नाही, मी काही दिले नाही, मी काही दोषी नाही. माझे दुर्दैव आहे मी भुमरे साहेबांचा ड्राइव्हर असल्याने यात माझे नाव घेतले जात आहे. पण यात माझा काही संबंध नाही.

नेमके काय आहे प्रकरण?
दूध डेअरी सिग्नल ते काल्डा कॉर्नर मार्गावरील अंदाजे १५० कोटींचा पडीक भूखंड खासदार संदिपान भुमरे यांचा चालक जावेद शेख यांच्या नावावर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हैदराबादचे मीर महेमूद अली खान यांनी ही जमीन ‘भेट’ म्हणून दिल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, एवढ्या मोठ्या किमतीचा भूखंड एका चालकाच्या नावावर दिला गेल्याने हा व्यवहार संशयास्पद ठरत असून परभणीतील वकिलाने आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, जमिनीसाठी सुमारे ९० लाख ते १ कोटी रुपये रोख किंवा आरटीजीएसने दिल्याचा दावा आहे. यासाठी करारनामा व हिबानामा तयार करण्यात आला. मात्र, भुमरे यांच्या हस्तक्षेपामुळे खोट्या दस्तऐवजांद्वारे ही मालमत्ता जावेद शेख यांच्या नावावर करण्यात आल्याचा आरोप आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
मास्टर ब्लास्टरचा पाककौशल्य 'सिक्सर'; सचिन तेंडुलकरने बनवले खास उकडीचे मोदक
00:40
Video thumbnail
थिएटरच्या स्क्रीनमधून थेट स्कॉर्पिओ बाहेर! व्हिडिओ पाहून प्रेक्षकांची धांदल
00:18
Video thumbnail
अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याची दृश्ये कॅमेऱ्यात कैद; पहा 'क्लिअर' व्हिडिओ
00:30
Video thumbnail
मराठा आरक्षण आंदोलन; सरकारच्या सकारात्मक भूमिकेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतले उपोषण
00:56
Video thumbnail
Manoj Jaramge Andolan|मनोज जरांगेंच्या आंदोलनाचे पडसाद; लातुरात मराठा समाजाचा रास्ता रोको
01:35
Video thumbnail
Latur|जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प मिळून फक्त 32 टक्के पाणी साठा;अनेक गावांना तीव्र पाणी टंचाईच्या झळा.
03:04
Video thumbnail
Latur|डिझेल संपलं! लातूर जिल्ह्यात इंधन टंचाईचे सावट
02:29
Video thumbnail
Latur|NEET पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरच्या आर्थिक व्यवहारांचा CBI तपास...
04:33
Video thumbnail
Latur|माजी आमदार धिरज देशमुखांच्या पुढाकाराने कॅनॉलला पाणी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा
02:35
Video thumbnail
साकोळ येथे बकरी ईदनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन; मुस्लीम बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
05:42
Video thumbnail
‘हिल हिल पोरी हिला’ वर डॅनी पंडित आणि धनश्री वर्माचा धमाका! पाहा भन्नाट डान्स रील.
00:58
Video thumbnail
नांदेडमध्ये काँग्रेसचा इंधन दरवाढीविरोधात हल्लाबोल;बैलगाडीतून दुचाकी नेत काँग्रेसचं अनोखं आंदोलन
02:09
Video thumbnail
Himayatnagar|नगराध्यक्ष उतरले थेट श्रमदानात!;हिमायतनगरच्या पाणीप्रश्नावर तोडगा
01:37
Video thumbnail
Latur\खंडापूर सप्ताहातील दानरक्कम घेऊन महाराज गायब?;“किशोर महाराजांना अटक करा” ; वारकऱ्यांचा आक्रोश
02:52
Video thumbnail
Latur|लातुरात शिवसेनेचा शक्तिप्रदर्शन मेळावा; २५ हजार कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
07:20

Latest news