Homeमुख्य बातम्या१ एप्रिलपासून होणार टोल नाका ‘कॅश फ्री’

१ एप्रिलपासून होणार टोल नाका ‘कॅश फ्री’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणा-या वाहनधारकांसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या १ एप्रिल २०२६ पासून देशातील सर्व टोल प्लाझा पूर्णपणे ‘कॅशलेश’ होणार आहेत. याचाच अर्थ, १ एप्रिलनंतर टोल भरण्यासाठी रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही. केवळ ‘फास्टॅग’ आणि ‘युपीआय’ हे दोनच पर्याय प्रवाशांसाठी उपलब्ध असतील.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, टोल नाक्यांवरील मानवी हस्तक्षेप कमी करण्यासाठी आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ‘कॅश लेन’ पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत टोल नाक्यावर किमान एक लेन रोख पेमेंटसाठी खुली असायची, ती आता कायमची बंद होईल. जर तुमच्याकडे वैध फास्टॅग नसेल किंवा त्यात शिल्लक नसेल, तर तुम्हाला दंड म्हणून टोलची १.२५ पट रक्कम ‘युपीआय’द्वारे भरावी लागेल. हा निर्णय म्हणजे भविष्यातील ‘बॅरियर-फ्री’ टोलिंग आणि ‘जीपीएस’ आधारित टोल प्रणालीच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR