22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeलातूरभुयारी गटारी कामाचा दर्जा निकृष्ट

भुयारी गटारी कामाचा दर्जा निकृष्ट

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरात सध्या अनेक ठिकाणी भुयारी गटारीचे काम सुरु आहेत तर काही ठिकाणी कामे पूर्णत्वास गेली आहेत. सदरील कामी वापरण्यात येणा-या घाण पाणी वाहून नेणा-या पाईपची साईज लहान आकाराच्या आहेत. भविष्यात या पाईप लहान पडून पाण्याच्या व कच-याच्या ओघाने ब्लॉक होण्याची शक्यता वाटते त्यामुळे या पाईपची प्रत्यक्ष पाहणी करुन आयुक्तांनी तो तात्काळ बदलावा, या मागणीचे निवेदन लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दि. २५ जुलै रोजी लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांची भेट घेऊन दिले.
तसेच भुयारी गटार कामासाठी नव्याने बनवलेले रस्तेही खोदण्यात येत आहेत सदर रस्ते जेसीबी मशीनने खोदण्यात येत असल्याने पूर्ण रस्ता खराब होत आहे. त्यामुळे नवीन सिमेंट रस्ता कटरच्या सहाय्याने तोडून पुन्हा पॅच करावा भुयारी गटारी कामाचा दर्जासुद्धा चांगला नसल्याने या निकृष्ट कामाची दखल महापालिका आयुक्तांनी तात्काळ घ्यावी, असेही निवेदनात नमुद केले आहे.
यावेळी गणेश देशमुख, प्रा. प्रवीण कांबळे, प्रवीण सूर्यवंशी, अ‍ॅड. देविदास बोरुळे-पाटील, जालिंदर बर्डे, धनंजय शेळके, अक्षय मुरुळे, विजय टाकेकर, रत्नदीप अजनिकर, ख्वॉजामियाँ शेख, गिरीश ब्याळे, अँड. सुनीत खंडागळे, विजय गायकवाड, कुणाल वागज, अभिषेक पतंगे, पिराजी साठे, शेख कलीम, आकाश मगर, राजू गवळी आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR