भाईंदर : काशीगाव पोलीस ठाणे हद्दीत राहर्णाया महिलेला तिच्या नव-याची आणि भावाची दारू सोडवतो सांगत भोंदू बाबाने महिलेकडून दागिने आणि रोख रक्कम अशी ६ लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी भोंदू बाबाला अटक करण्यात आली आहे.
काशीगाव येथील जनता नगर झोपडपट्टीमध्ये राहणा-या महिलेला त्यांच्या चाळीमध्ये राहणारे अयोध्या प्रसाद गिरी हे दारु सोडविण्याचे औषध देतो, मला तंत्र मंत्र विद्या अवगत असून मी भुत प्रेत लागीर, बाधा झालेल्या लोकांवर उपचार करतो त्यांची त्यातून मुक्तता करतो असे सांगितले.
महिलेच्या अज्ञानाचा फायदा घेवून भोंदुगिरी बुवा बाजी करुन, त्याने तिच्या नर्वयाची आणि भावाची दारू सोडवतो तसेच तुमच्या पतीला जिन लगा है वो आठ दिन मे मरने वाले है अशी भिती दाखवली. त्यासाठी पूजा करावी लागेल, असे सांगून तसेच गुप्तधन काढून देतो असे सांगत त्याने महिलेकडुन २ लाख ७० हजार रूपये रोख रक्कम व ८४ ग्रॅम वजनाचे विविध प्रकारचे सोन्याचे दागिने असे एकूण