26.1 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeलातूरमंडईत भाजीपाल्याची आवक ५० टक्के

मंडईत भाजीपाल्याची आवक ५० टक्के

लातूर : प्रतिनिधी
शहरातील महात्मा फुले भाजी मंडईत गेल्या काही दिवसापासून भाजीपाल्याची आवक सातत्याने घटत आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढत असले तरी या आठवड्यात मात्र ही वाढ दिसून आली नाही. या आठवड्यातही शहरातील बाजार समितीत भाजीपाल्याची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत मोठया प्रमाणात घटली आहे. मात्र सर्वसामान्यांच्या गरजेच्या भाज्यांची आवक घटुनही किरकोळ बाजारात भाज्यांचे दर स्थिर राहील्याचे दिसत आहे.
गेल्या काही दिवसापासून शहरातील मंडईत भाजीपाल्याची आवक सरासरीच्या तुलनेत कमी होत चालली आहे. सध्या महात्मा फुले भाजी मंडईत ७९१ क्ंिवटल भाजीपाल्याची आवक झाली आहे. दिवसेंदिवस ही घटत चाल्याचे दिसून येत आहे.   शहरातील बाजार समितीत शनिवारी झालेल्या भाजीपाल्याची आवक प्रति दहा किलोत वागें २६ क्ंिव्टलपर्यंत आवक होऊन सर्वसाधारण भाव ७० रुपये प्रति दहा किलो दर मिळाला. दोडका १३ क्ंिव्टलपर्यंत आवक होऊन भाव ४५० रुपये, भेंडि १८ क्ंिव्टलपर्यंत आवक होऊन ३०० रुपये भाव, पत्ताकोबी ३४ क्ंिव्टलपर्यंत आवक होऊन १०० रुपये, फुलगोबी ५५ क्ंिव्टलपर्यंत आवक होऊन १५० रुपये, गावरान टमाटे ११९ क्ंिव्टलपर्यंत आवक होऊन १०० रुपये, वैशाली टोमॅटो १७२ क्ंिव्टलपर्यंत आवक होऊन १२० रुपये,
गवार शेंगा ७ क्ंिव्टलपर्यंत  आवक होऊन ५०० रुपये, पालक १  क्ंिव्टलपर्यंत  आवक होऊन ८० रुपये, गाजर ४०  क्ंिव्टलपर्यंत आवक होऊन १२० रुपये, भोपळा  ३४  क्ंिव्टलपर्यंत  १०० रूपये, कोंथीबीर ३६  क्ंिव्टलपर्यंत  आवक होऊन २०० रुपये, हिरव्या मिरचीची ६३  क्ंिव्टलपर्यंत आवक होऊन ४०० रुपये, वैशाली मिरची १७  क्ंिव्टलपर्यंत  आवक होऊन २४० रुपये, वरणा ३०  क्ंिव्टलपर्यंत  आवक होऊन ३०० रुपये, वटाना १३  क्ंिव्टलपर्यंत  आवक होऊन ३०० रुपये, शेवगा २१ क्ंिव्टलपर्यंत  आवक होऊन ४०० रुपये, मेथी २९  क्ंिव्टलपर्यंत  आवक होऊन ३०० रुपये, कांदा पात ९  क्ंिव्टलपर्यंत  आवक होऊन ३०० रुपये, ंिलबू १६  क्ंिव्टलपर्यंत  आवक होऊन ४२० रुपये, काकडी २२  क्ंिव्टलपर्यंत आवक होऊन १२० रुपये, कारले १२  क्ंिव्टलपर्यंत  आवक होउन २४० रूपये, बिट ३  क्ंिव्टलपर्यंत आवक होऊन १५० रुपयापर्यंत प्रति दहा किलाकला दर मिळाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR