17.6 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeमहाराष्ट्रमंत्री राणे, खाडेंच्या वक्तव्याने वाद

मंत्री राणे, खाडेंच्या वक्तव्याने वाद

नव्या वादाला फुटले तोंड, टीकेची झोड उठविली
सांगली : प्रतिनिधी
राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत आज मिरज येथे हिंदू गर्जना सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत राणेंनी आम्ही ईव्हीएममुळेच जिंकलो. पण ईव्हीएम म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मोहल्ला असे म्हणत त्यांनी एका समुदायाला लक्ष्य केले. त्याचवेळी माजी मंत्री आणि मिरजचे आमदार सुरेश खाडे यांनी मिरज विधानसभेचा उल्लेख मिनी पाकिस्तान असा केला. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. दरम्यान, मिरज मतदारसंघ हा मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे. त्यामुळे त्यांचे वक्तव्य महागात पडू शकते.

विधानसभा निवडणुकांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपला पराभव झाला. निसटता पराभव आपल्या पदरी पडला, काही मते कमी पडली. पण विधानसभा निवडणुकांवेळी बटेंगे तो कटेंगे या ना-यावर सगळा हिंदू एकत्र झाला आणि विधानसभेचा निकाल भरभराटीने दिसून आला. आज सभागृहात एवढीच गल्ली त्यांच्यासाठी राहिली, बाकी सगळे सभागृह आपले आहे. आम्ही जरी दलित असलो तरी आम्ही हिंदू आहे. आम्ही पण मिनी पाकिस्तानमध्ये लढतो. मी मिनी पाकिस्तानमधून चारवेळा चौकार मारत आमदार झालो, असे माजी मंत्री व मिरजचे आमदार सुरेश खाडे यांनी म्हटले. त्यामुळे वाद निर्माण झाला.

दरम्यान, नितेश राणेंनी जो नियम हिंदूंना लागू होतो तो इतर धर्मालाही लागला पाहिजे. आता सरकार हिंदुत्ववादी आहे, आता कोणाचे लाड चालणार नाहीत, अशा शब्दात राणेंनी भाषणातून आपली भूमिका मांडली. त्यांनी वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. तसेच विरोधी नेत्यांनीही त्यांच्यार टीका केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR