24 C
Latur
Monday, January 27, 2025
Homeमहाराष्ट्रमंत्र्यांना कार्यालये व शासकीय निवासस्थाने, आता कामाला लागा

मंत्र्यांना कार्यालये व शासकीय निवासस्थाने, आता कामाला लागा

पंकजा मुंडे यांना रामटेक, विखे पाटलांना रॉयलस्टोन !

मुंबई : (प्रतिनिधी)
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला एक महिना पूर्ण होत असताना अखेर नवे सरकार कामाला लागले आहे. नागपूर अधिवेशनात मंत्रिमंडळ विस्तार व शनिवारी खातेवाटप झाल्यानंतर आणखी वेळ न घालवता मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना त्यांची कार्यालये व निवासस्थाने वितरित केली आहेत. यामुळे गेले महिनाभर थांबलेले प्रशासकीय काम सुरू होणार आहे. पंकजा मुंडे यांना रामटेक हे शासकीय निवासस्थान देण्यात आले असून स्व.गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री असताना येथे रहात असत.

२३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीची मतमोजणी झाली. परंतु मुख्यमंत्री पदासाठी, विशिष्ठ खात्यांसाठी झालेल्या रस्सीखेच संपूर्ण मंत्रिमंडळ स्थापन होण्यास व खातेवाटप व्हायला एक महिना लागला आहे. अखेर शनिवारी रात्री खातेवाटप झाल्यानंतर आज मंत्रालयातील दालने व शासकीय निवासस्थानाचे वाटप करण्यात आले. त्यामुळे मंत्र्यांना आता आपल्या खात्याची आचारसंहितेपासून तुंबलेली कामं मार्गी लावता येणार आहेत.

मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांची कार्यालये असतील. तर अन्य मंत्र्यांची कार्यालये पुढीलप्रमाणे असणार आहेत.(कंसात शासकीय निवासस्थान) राज्यमंत्र्यांना तात्पुरती व्यवस्था म्हणून विधानभवनात कार्यालये देण्यात आली आहेत.

चंद्रशेखर बावनकुळे – दालन क्र. १०१ ते १०८ पहिला मजला
राधाकृष्ण विखे पाटील – दालन क्र. ५०४ ते ५०८ पाचवा मजला
हसन मुश्रीफ – दालन क्र. २०५ ते २०७, दुसरा मजला
चंद्रकांत पाटील, दालन क्र. ३०२ ते ३०७, तिसरा मजला
गिरीश महाजन, दालन क्र. ६०५ ते ६०९, सहावा मजला (विस्तार इमारत)
गणेश नाईक – दालन क्र. ५३६ ते ५४० चौथा मजला
संजय राठोड, दालन क्र. १०२, पहिला मजला
दादा भुसे, दालन क्र. ७०० विस्तार इमारत
संजय राठोड, दालन क्र. १०२ पहिला मजला
धनंजय मुंडे, दालन क्र. २०१ दुसरा मजला,विस्तार इमारत
मंगलप्रभात लोढा, दालन क्र. २०२, दुसरा मजला
उदय सामंत, दालन क्र. १०१,पहिला मजला
जयकुमार रावल, दालन ४०७, चौथा मजला
पंकजा मुंडे, दालन ४०३, चौथा मजला
अतुल सावे, दालन ५०१ पाचवा मजला
अशोक उईके, दालन ५०२ पाचवा मजला
शंभूराज देसाई, दालन ३०२, तिसरा मजला
आशिष शेलार, दालन ४०१, चौथा मजला
दत्तात्रय भरणे, दालन ३०१, तिसरा मजला
आदिती तटकरे, दलान १०३, पहिला मजला
शिवेंद्रराजे भोसले, दलान ६०१सहावा मजला
माणिकराव कोकाटे, दालन २०३, दुसरा मजला
जयकुमार गोरे, पोटमाळा, मंत्रालय, मुख्य इमारत
नरहरी झिरवाळ, दालन २०१, दुसरा मजला
संजय सावकारे, दालन ३०३ तिसरा मजला
संजय शिरसाट, दालन ७०३ सातवा मजला
प्रताप सरनाईक, दालन ३०४ तिसरा मजला
भरत गोगावले, दालन ३१४ तिसरा मजला
मकरंद जाधव, दालन, ३३६ तिसरा मजला
नितेश राणे, पोटमाळा, मंत्रालय दुसरा मजला
आकाश फुंडकर, दालन ११५,पहिला मजला
बाबासाहेब पाटील, दालन ५०१ पाचवा मजला
प्रकाश आबिटकर, दालन क्र. २२७, दुसरा मजला

राज्यमंत्री
आशिष जयस्वाल, दालन ६२६ सहावा मजला
माधुरी मिसाळ, दालन १३८ पहिला मजला
पंकज भोयर, दालन २३७ दुसरा मजला
मेघना बोर्डीकर, विधान भवन दालन १२५
इंद्रनील नाईक, विधान भवन दालन १२३
योगेश कदम, विधान भवन, दालन ११७

मंत्र्यांची शासकीय निवासस्थाने पुढीलप्रमाणे
राहुल नावेकर, अध्यक्ष विधानसभा – शिवगिरी
राम शिंदे, सभापती विधानपरिषद – ज्ञानेश्वरी
चंद्रशेखर बावनकुळे – चित्रकूट
पंकजा मुंडे – रामटेक
राधाकृष्ण विखे पाटील – रॉयलस्टोन
शंभूराज देसाईं – मेघदूत
गणेश नाईक -पावनगड
धनंजय मुंडेंना-सातपुडा
चंद्रकांत पाटील – सिंहगड
हसन मुश्रीफ – विशाळगड
गिरीश महाजन – सेवासदन
गुलाबराव पाटील – जेतवन
गणेश नाईक – पावनगड
दादा भुसे – जंजीरा
संजय राठोड – शिवनेरी
मंगलप्रभात लोढा – विजयदुर्ग
उदय सामंत – मुक्तागिरी
जयकुमार रावल – पर्णकुटी
अतुल सावे – शिवगड
अशोक उईके – लोहगड
दत्तात्रय भरणे -सिध्दगड
अदिती तटकरे -प्रतापगड
शिवेंद्रराजे भोसले -पन्हाळगड
माणिकराव कोकाटे -अंबर
जयकुमार गोरे -प्रचितीगड
नरहरि झिरवाळ – सुरुचि ०९,
संजय सावकारे अंबर-३२,
संजय शिरसाठ अंबर-३८,
प्रताप सरनाईक अर्वतो-५, भरत गोगावले सुरुचि ०२,
मकरंद पाटील सुरुचि-०३

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR