नांदेड : प्रतिनिधी
शिवाजीनगर येथील रहिवासी व हल्ली मुंबई येथे स्थायिक झालेले मधुकरराव माणिकराव खरवडकर (वय ८८) यांचे मुंबई येथील लीलावती रुग्णालयात उपचारादरम्यान दि. २६ मार्च २०२५ रोजी निधन झाले. मूळ नांदेडचे रहिवासी असलेले खरवडकर मंत्रालयातून मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून १९९५ मध्ये सेवानिवृत्त झाले.
त्यांची बहुतांश शासकीय सेवा मंत्रालयात झाली व तेथून ते निवृत्त झाले. हल्ली ते आपल्या मुंबई येथील मुलाकडे वास्तव्याला होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुन, दोन मुली व जावई असा परिवार आहे.