31.4 C
Latur
Wednesday, April 30, 2025
Homeमहाराष्ट्रमध्यवर्ती बँक रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवल्याप्रकरणी अजित पवारांवर गुन्हा दाखल

मध्यवर्ती बँक रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवल्याप्रकरणी अजित पवारांवर गुन्हा दाखल

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यातील मतदान पार पडले. यामध्ये काल देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे देखील मतदान पार पडले. मात्र त्यानंतर आता अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. वेल्ह्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवल्याप्रकरणी बँक व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर या बँकेचे फोटो आणि व्हीडीओ शेअर केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

मतदानाच्या पूर्वरात्री वेल्ह्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात आली होती. रोहित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वेल्हे शाखा रात्री बारानंतर सुरू असल्याची माहिती समाजमाध्यमातून व्हायरल केली. त्यानंतर वेल्हे तालुक्यातील भरारी पथक तेथे पोहोचले. याबाबत रमेश अजिनाथ बेलेकर (वय ३५, रा. नसरापूर, ता. भोर, जि. पुणे) यांनी वेल्हे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रमेश बेलेकर वेल्ह्यात कृषि सहायक आहेत. त्यांची निवडणूक आयोगाकडून वेल्हे तालुक्यात भरारी पथकाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

भरारी पथकाने घटनास्थळी धाव घेत तेथे पाहणी केली. तेव्हा बँक व्यवस्थापकांच्या दालनाच्या बाहेर ४० ते ५० जण थांबले होते. त्यानंतर भरारी पथकाने बँक व्यवस्थापक तेलावडे यांच्याशी संपर्क साधला. बँकेतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासायचे असल्याचे भरारी पथकाकडून सांगण्यात आले. त्यानंतर बँकेचे विभागीय अधिकारी प्रकाश गायकवाड यांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यास परवानगी दिली. सीसीटीव्ही चित्रीकरणात ४० ते ५० जण बँकेत आढळून आले. बँकेची वेळ संपल्यानंतर मध्यरात्रीनंतर बँक सुरू ठेवण्यात आली होती. याप्रकरणी बँक व्यवस्थापक विनायक तेलावडे यांच्याविरुध्द आदेशाचा भंग केल्याप्रकरणी (भादंवि १८८) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR