29.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeसोलापूरसहा वर्षांनंतर जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू

सहा वर्षांनंतर जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू

सोलापूर : जिल्ह्यातील काही गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पण, प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू झाल्यास टँकरवरील खर्च कमी होऊन त्या गावाकऱ्यांना दुष्काळात पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार नाही. त्यासाठी जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा सुरू केली आहे. आता उर्वरित योजना देखील सुरू करण्याचा प्रयत्न आहे.असे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीमनीषा आव्हाळे यांनी सांगीतले.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ७०हून अधिक टँकर सुरू आहेत. जलजीवन मिशन व बंद पडलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठ्याच्या योजना सुरू झाल्यास टँकरवरील खर्चात बचत होईल या हेतूने जिल्हा परिषदेच्या प्रशासक मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे विशेष आहेत. त्यांच्या प्रयत्नातून २०१८मध्ये बंद पडलेली जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनी सुरू झाली आहे.जिल्ह्यातील उजनी धरणावरून १०० अधिक ग्रामपंचायतींचा व काही नगरपरिषदांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. जेऊर प्रादेशिक योजनेवर २९ गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. तर सांगोल्यातील शिरभावी योजनेवर तब्बल ८२ गावांचा आणि पंढरपूरच्या भोसे पाणीपुरवठा योजनेवर देखील ४० गावांचा आणि मंगळवेढ्यातील कासेगाव योजनेवर १२ गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. या योजना अनेक वर्षांपासून बंद पडल्या आहेत.

पाइपलाइन जीर्ण झाली असून त्याच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून यापूर्वीच निधी घेतला होता. भोसे योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून कासेगाव योजनेचेही काम लवकरच पूर्ण होणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे असलेली सांगोल्यातील शिरभावी योजना देखील सुरू व्हावी, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी लक्ष घातले आहे. दोन दिवसात त्या सांगोल्याचा दौरा करणार आहेत. त्यानंतर त्या भोसे पाणीपुरवठा योजनेचाही आढावा घेणार आहेत.

लोकसभा निवडणुकीची सध्या आचारसंहिता सुरू आहे, पण दुष्काळी उपाययोजनांसाठी त्याचा अडथळा नाही, अस जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्याअनुषंगाने १६३ गावांचा पाणीप्रश्न सोडवणाऱ्या पण सध्या बंद पडलेल्या शिरभावी, भोसे, जेऊर व कासेगाव या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुष्काळात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करायला लागू नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकरी मनीषा आव्हाळे या प्रयत्न करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR