25.4 C
Latur
Monday, July 1, 2024
Homeमहाराष्ट्रमनोज जरांगे हे राजकारणाचे केंद्रबिंदू, येत्या १० दिवसांत ब्रेकिंग न्यूज मिळणार

मनोज जरांगे हे राजकारणाचे केंद्रबिंदू, येत्या १० दिवसांत ब्रेकिंग न्यूज मिळणार

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
मनोज जरांगे पाटील हे आता राजकारणाचे आयकॉन केंद्रबिंदू आहेत. त्यांच्या एका शब्दावर लाखो लोक जमा होतात, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. मनोज जरांगे यांच्या मागण्यांचा महाराष्ट्र सरकार गंभीर विचार करत आहे. येत्या १० दिवसांत या विषयावर तोडगा निघून तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल असे मोठे वक्तव्य सत्तार यांनी केले आहे.

मनोज जरांगे यांनी मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्याचे मी स्वागत केले आहे. पण काही चिल्लर लोक खडखड करत आहेत. मी आजही आपल्या शब्दावर ठाम असून, मनोज जरांगे यांनी केलेल्या निर्णयाचे स्वागतच करतो असे जरांगे पाटील म्हणाले. कुणात दम असेल तर समोर या, असेही सत्तार म्हणाले. कुणाच्या आरक्षणाला धक्का न लागता हे आरक्षण द्यावे, अशी माझी मागणी होती. ओबीसींवर अन्याय करा असे मी काही म्हटले नाही, असंही जरांगे पाटील म्हणाले.

मुस्लिम समाजाला मोठा निधी
मनोज जरांगे आता राजकारणाचे आयकॉन केंद्रबिंदू आहेत. त्यांच्या एका शब्दावर लाखो लोक जमा होतात असेही जरांगे पाटील म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही मुस्लिम समाजाच्या भावना कळवल्या आहेत. निजाम सरकार असताना देखील मुस्लिमांना जेवढा निधी मिळाला नाही तेवढा आमच्या सरकारमध्ये मिळाला असेही सत्तार म्हणाले.

प्रत्येकाला आपल्या समाजाचा अभिमान असतो
मुस्लिम आरक्षणाची आम्ही मागणी केली आहे, त्याला न्याय मिळेल. प्रत्येकाला आपल्या समाजाचा अभिमान असतो. आम्हाला न्याय दिला पाहिजे आणि त्याची मागणी आम्ही करत असल्याचे सत्तार म्हणाले. मुस्लिम आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी दोनदा बोललो आहे. देशभरात अनेक मतदारसंघात मुस्लिमांचे विरोधात मतदान झाले आहे. प्रत्येक कॅबिनेटमध्ये मला जे काही बोलायचे आहे, ते मी बोलत असतो असेही सत्तार म्हणाले. मुस्लिमांची एकी पाहायचे असेल तर लोकांनी निवडणुकीत लाईन लावून मतदान केले. माझ्यासारखे दोन-चार टक्के नसतील गेले, पण एखाद्या दिवशी मी देखील त्या लाईनमध्ये जाईल असेही सत्तार म्हणाले.

पीक विमा देताना ज्यादा पैसे घेतले तर कारवाई होणार

एक रुपयात पीक विमा देण्यात येत आहे. असे असताना कोणी ज्यादा पैसे घेत असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल असेही अब्दुल सत्तार म्हणाले. दरम्यान, आज फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हवा आहे. मी पैलवान आहे. कोणासोबत तरी लढायचं आहे, असेही सत्तार म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR