मराठवाड्यात कडकडीत बंद

जरांगेंना समर्थन, दुकानांसह व्यवहार बंद ठेवून पाठिंबा, अनेक ठिकाणी रास्ता रोको
छ. संभाजीनगर/लातूर
मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू केले. गुरुवारी त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस होता. त्यांची प्रकृती खालावत चालल्याने सरकारच्या भूमिकेच्या निषेधार्थ आणि जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी मराठवाड्यात सर्वत्र बंद पाळण्यात आला. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत आणि गावोगावी रास्ता रोको करून या आंदोलनात सहभाग नोंदवला. तसेच मोठ्या शहरांत व्यापारपेठा, दुकाने बंद ठेवून बंदला पाठिंबा देण्यात आला. त्यामुळे अनेक ठिकाणी बाजारपेठांमध्ये दिवसभर शुकशुकाट पाहायला मिळाला. दरम्यान, रास्ता रोकोमुळे वाहतूकही ठप्पही ठप्प झाली.

मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी जरांगे पाटील यांचा लढा सुरू असून, अंतरवाली येथे गेल्या ६ दिवसांपासून ते उपोषण करीत आहेत. काल त्यांची प्रकृती चांगलीच खालावली होती. त्यामुळे मराठा बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे बुधवारीच सकल मराठा समाजाच्या वतीने जरांगे यांच्या समर्थनार्थ बंदची हाक दिली होती. त्यामुळे मराठवाड्यातील छ. संभाजीनगर, जालना, बीडसह हिंगोली, परभणी, नांदेड, धाराशिव, लातूर सर्वच जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. या बंदला व्यापा-यांसह सामान्य नागरिकांनी पाठिंबा दिला. त्यामुळे सर्वत्र कडकडीत बंद पाहायला मिळाला. राज्यात ब-याच भागात याचे पडसाद उमटले.

लातूर जिल्ह्यात कालच बंदची घोषणा केली होती. त्यामुळे गुरुवारी सकाळपासूनच या बंदचे पडसाद उमटले. लातूर शहरासह निलंगा, औसा, रेणापूर, लातूर तालुका, शिरुर अनंतपाळ, देवणी, उदगीर, जळकोटसह जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठा बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र या बंदचे पडसाद उमटले. ब-याच ठिकाणी रास्ता रोको करून सरकारच्या भूमिकेचा निषेध केला. जिल्ह्यातील मोठ्या गावांतदेखील बाजारपेठा बंद ठेवल्या. जिल्ह्यात या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पुकारलेल्या जिल्हा बंदला धाराशिवमध्येही मोठा प्रतिसाद मिळाला. धाराशिव तालुक्यातील आठही तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. धाराशिव शहरासह, कळंब, वाशी, भूम, परंडा, लोहारा, उमरगा, तुळजापूर तालुक्यात बंद पाळण्यात आला. तामलवाडी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सरमकुंडी फाट्यावर राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला. परंडा शहरात रास्ता रोको करण्यात आला. कळंब येथे बंद पाळण्यात आला. कळंब तालुक्यातील दहिफळ येथे पाण्याच्या टाकीवर चढून तरूणांनी शोले स्टाईल आंदोलन केले. धाराशिव तालुक्यातील तेर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. धाराशिव तालुक्यातील खामगाव येथे एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. लोहारा, उमरगा तालुक्यात ही कडकडीत बंद पाळण्यात आला. उमरगा शहरात मुस्लिम समाजाने पाठिंबा दिला.

परभणीतही तीव्र पडसाद
परभणी जिल्हा बंदच्या हाकेला गुरुवारी शहरातील व्यापा-यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली. तालुक्याच्या ठिकाणीही व्यापा-यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने जिल्ह्यात बंद कडकडीत पाहायला मिळाला. बंदच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी व्यापा-यांनी आपली दुकाने उघडलीच नाहीत. त्यामुळे गांधी पार्क, वसमतरोड, नवा मोंढा आदी भागात बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळाला. तालुक्याच्या ठिकाणीही कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील शाळा, महाविद्यालयांना सुटी दिली. बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

नांदेड जिल्ह्यात प्रमुख
महामार्गांवर रास्ता रोको
जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील मराठा बांधव रस्त्यावर उतरले. जिल्ह्यात बंद पुकारल्याने सर्वत्र दुकाने बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला. तसेच जिल्ह्यात प्रमुख महामार्गांवर रास्ता रोको केल्याने ब-याच ठिकाणी बराच वेळ वाहतूक ठप्प झाली. याचा फटका प्रवाशांना बसला. नांदेड-नागपूर, नांदेड-हैदराबाद, नांदेड-बिदर, नांदेड-जालना महामार्गावर वाहनांच्या ब-याच लांब रांगा लागल्या होत्या. हदगाव, हिमायतनगर, लोहा आणि कंधार या तालुक्यांत बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. नांदेडमध्येही कडकडीत बंद पाळला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
अयोध्येत रामललाच्या चरणी यामी गौतम; दर्शन आणि आशीर्वादानंतर केले 'नई नवेली' चित्रपटाचे प्रमोशन.
00:53
Video thumbnail
Hingoli|जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ॲक्शन मोडमध्ये!तहसील कार्यालयात अचानक धडक
02:31
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो, गुंठेवारीची प्रकरणे दाखल केलीत का? ३१ डिसेंबर अंतिम मुदत!
01:10
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उत्सुकता वाढली! दोन दिवसांत २२९ अर्जांची विक्री
02:47
Video thumbnail
Latur|ऐन दुष्काळात आगीचं तांडव, 15 एकर ऊस जळून खाक #breakingnews
00:26
Video thumbnail
Latur|बशीर शेखच्या इमारतींचा वाद; कागदपत्रांसाठी महापालिकेकडे वेळेची मागणी!
04:15
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो सावधान! नळाला तोटी नसेल तर २५ हजारांचा दंड; महापालिकेचा अलर्ट
02:39
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
21:34
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
00:00
Video thumbnail
Latur|आई तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी RTO चा सुरक्षा कवच!
06:24
Video thumbnail
Purna|बळीराजा साखर कारखान्याच्या १३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसाला ३,३००.७६ रुपये भाव जाहीर
02:36
Video thumbnail
Latur Drought|लातूरच्या दुष्काळावर तोडगा कधी? निलंगेकरांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक
02:25
Video thumbnail
Bashir Shaikh|लातूरच्या बशीर शेखविरोधात POCSO अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल!
03:21
Video thumbnail
Tuljapur|तुळजाभवानी मंदिरात पोलिसांची दादागिरी? सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
00:39
Video thumbnail
Latur|पदवीधर निवडणुकीत वचननाम्यावरून वाद! बालाजी पाटील चाकूरकर अडचणीत येणार?
02:16

Latest news