23.6 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा आणि कुणबी एकच

मराठा आणि कुणबी एकच

आमचा अंत पाहू नका, जरांगे पाटील यांचा इशारा
परभणी : प्रतिनिधी
शांतता रॅलीच्या दुस-या दिवशी मनोज जरांगे यांनी परभणीतून मराठा समाजाला संबोधित केले. महाराष्ट्रातील मराठ्यांनी कंबर कसली आहे. मराठा समाज पूर्ण पेटला आहे. मराठ्यांनो एक इंचही मागे हटायचे नाही. सरकार आणि भुजबळांनी ओबीसींचे नेते आपल्या विरोधात लढायला लावले आहेत. पण आमचा अंत पाहू नका. एकदा दोरी सुटली तर मग अवघड होईल. मराठा आणि कुणबी एकच आहेत. त्यामुळे आमची मागणी पूर्ण करावी, असे सांगत राज्य सरकारला सरसकट ओबीसी आरक्षणावरून इशारा दिला.

परभणीत आयोजित कार्यक्रमात बोलताना जरांगे पुढे म्हणाले की, तुम्ही काळजी करू नका. मी लई खंबीर आहे. मला म्हणतात हे अडाणी आहे, गावठी आहे. या गावठ्याने कसा खुट्टा खुपसला. ५४ लाख नोंदी निघाल्या आहेत. सरकारने तर मला सांगितलेय ५७ लाख नोंदी निघाल्या. एका नोंदीवर ३ प्रमाणपत्र निघतात. मराठ्यांची मताने ताकत दिसली. यांना ताकदीने पाडले की नाही. आमची मागणी आहे, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या.

तर पुन्हा मुंबई
ज्यांची नोंद निघाली आणि ज्याची नाही निघाली, त्याचीही नोंद घेऊन प्रमाणपत्र द्यायचे. सरसकट प्रमाणपत्र द्या. म्हणूनच आपल्याला १३ तारखेच्या आत सगेसोयरेची अंमलबजावणी पाहिजे. १३ तारखेपर्यंत नाही झाली की मग.. असे जरांगेंनी म्हणताच लोकांमधून मुंबई-मुंबई असा आवाज आला. त्यावेळी, बघू मग आता मुंबई तर मुंबई, असे जरांगे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR