मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिने स्वत:साठी एक नवीन कार खरेदी केली आहे. मलायकाने पिवळ्या रंगाची महिंद्रा थार रॉक्स स्टार एडिशन कार घेतली आहे. या नव्याको-या कारची पूजा करताना मलायकाचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र यातील एक गोष्ट खटल्याने काही नेटक-यांनी तिच्यावर टीका केली आहे.
या व्हीडीओत मलायका गाडीची पूजा करताना दिसत आहे. अभिनेत्रीने डीप नेक ड्रेस घातल्याचं दिसत आहे. मॉडर्न असूनही परंपरा जपत गाडीची पूजा केल्याने मलायकाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. मात्र गाडीची पूजा करताना, हातात आरतीचं ताट असताना मलायकाच्या पायात चप्पल बघून नेटक-यांनी तिला ट्रोल केले आहे.
‘सँडल घालून पूजा करायची नसते एवढं पण माहीत नाही का’ , ‘एवढा दिखावा केलाच आहे तर चप्पल पण काढायची होती ना’ , ‘सँडल घालून पूजा करणं म्हणजे मॉडर्न नाही’, अशा कमेंट करत नेटक-यांनी मलायकावर टीका केली आहे. इन्स्टंट बॉलिवूड या पापाराझी इन्स्टाग्राम अकाऊंटवरून मलायकाचा एक व्हीडीओ शेअर करण्यात आला आहे.
















