अमरावती : सततच्या पावसानानंतर मागील आठ- दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे शेतकरी पीक काढणीचे काम करत आहे. अशात मशीनद्वारे शेतातील सोयाबीन काढणीचे काम सुरु असताना दुर्दैवी घटना घडली असून या घटनेत तरुण शेतक-याचा मशीनमध्ये अडकून मृत्यू झाला आहे. अचानक घडलेल्या या घटनेने कुटुंबीय हादरले आहे.
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील कावली वसाड शेत शिवारात सदरची घटना घडली असून यात गौरव कावरे असे मृत झालेल्या शेतक-याचे नाव आहे. दरम्यान पावसाने उघडीप दिली असल्याने शेतात काढणी करण्याचे बाकी असलेले काम शेतकरी करत आहेत. प्रामुख्याने सोयाबीन आणि मका काढणीच्या कामाला वेग आला असून कापूस वेचणी देखील सुरु आहे. अशात दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.