19 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeलातूर‘महात्मा बसवेश्वर’च्या विद्यार्थ्यांनी गाजवला महोत्सव 

‘महात्मा बसवेश्वर’च्या विद्यार्थ्यांनी गाजवला महोत्सव 

लातूर : प्रतिनिधी
येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व सहयोग शिक्षणशास्त्र  महाविद्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १८ ते २१ ऑक्टोंबर यादरम्यान आयोजित ज्ञानतीर्थ युवक महोत्सव-२०२४ मध्ये पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थी कलावंतांनी युवक महोत्सव गाजवला.
सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्री महात्मा बसेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ  सांगवे हे होते तर प्रमुख अतिथी शिक्षण संस्थेचे सचिव माधवराव पाटील टाकळीकर, सहसचिव सुनील मिटकरी, ज्येष्ठ संचालक बाबूराव तरगुडे, संचालक राजेश्वर  बुके, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई, उपप्राचार्य प्रा. संजय पवार, उपप्राचार्य प्रा. बालाजी जाधव, पर्यवेक्षिका प्रा. वनिता पाटील, डॉ. आनंद शेवाळे,  डॉ. विजयकुमार सोनी, डॉ. यशवंत वळवी, डॉ रत्नाकर बेडगे, डॉ. मनोहर चपळे आदीची मंचावर उपस्थिती होती. या प्रसंगी विविध कलाप्रकारात नैपुण्य मिळवणा-या कलावंतांचा यथोचित गौरव करण्यात आला. या युवक महोत्सवात कथाकथन या कला प्रकारात महाविद्यालयाची विद्यार्थिनी शिवाली मुकडे हीचा सुवर्णपदकासह विद्यापीठात सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळाला.
लावणीमध्ये वैष्णवी स्वामी सर्वतृतीय, समूहगीत पाश्चात्य सर्वतृतीय सहभागी विद्यार्थी आगलावे मिताली, सूर्यवंशी साक्षी, पांचाळ भक्ती, निर्मळ सानिया, सेलूकर सिद्धी, स्वामी स्वाती, लोकसंगीत आर्केस्ट्रा सर्वतृतीय सहभागी विद्यार्थी शिंदे गणेश, कुंभार रोहित, पांचाळ कैवल्य, दाडगे तुकाराम, येवणगे विजय, शेलार अजय, पांचाळ विकास, आगलावे मिताली, पांचाळ भक्ती, लोकनृत्य या कला प्रकारात सर्वतृतीय सहभागी कलावंत कार्तिक रसाळ, नेहा गायकवाड, समृद्धी शिंदे, वैष्णवी स्वामी, सुनील कोल्हे, सानिया निर्मळ, अनिकेत राऊत, शीतल चव्हाण, ज्ञानेश्वर वाघमारे, साईनाथ स्वामी, विडंबनमध्ये सर्वतृतीय सहभागी कलावंत भुरे सत्यम, वाघमारे ज्ञानेश्वर, मस्के वैभव, स्वामी वैष्णवी. या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ  सांगवे, सचिव माधवराव पाटील टाकळीकर, सहसचिव सुनील आप्पा मिटकरी, राजेश्वर  बुके, बाबूराव तरगुडे यांच्या शुभहस्ते, शाल, ग्रंथ पुष्पहार देऊन  सन्मानित करण्यात आले.  प्रास्ताविक डॉ. रत्नाकर बेडगे यांनी केले. मनोगत प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी मांडले. सूत्रसंचालन डॉ.अश्विनी रोडे, डॉ. राहूल डोंबे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. मनोहर चपळे यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR