23.4 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeलातूरमहात्मा बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाने राखली उज्वल यशाची परंपरा 

महात्मा बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाने राखली उज्वल यशाची परंपरा 

लातूर : प्रतिनिधी
श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यवसाय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी निकालाची उज्वल परंपरा कायम राखली आहे. या सर्व गुणवान आणि गुणवंत विद्यार्थी आणि पालकांचा स्मृति चिन्ह पुष्पहार आणि पेढे देवून संस्थेचे सचिव माधवराव पाटील टाकळीकर आणि कोषाध्यक्ष विजयकुमार रेवडकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई, उपप्राचार्य प्रा. संजय पवार, उपप्राचार्य प्रा. बालाजी जाधव, पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे, विज्ञान शाखेचे समन्वयक प्रा. वनिता पाटील, प्रा. नितीन वाणी, कला शाखेचे समन्वयक प्रा. रवींद्र सोनोने, प्रा. विश्वनाथ स्वामी, वाणिज्य शाखेचे समन्वयक प्रा. कल्पना गिराम, डॉ. घनश्याम ताडेवार, व्होकेशनल शाखेचे समन्वयक प्रा. व्यंकट दुडीले आणि  स्टाफ सचिव प्रा. रवींद्र सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावर्षी विज्ञान शाखेत एकूण ४३४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी ४०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाखेचा निकाल ९२.८५ टक्के आहे. या शाखेतून कु. शिंदे शुभांगी बालाजी ८६.८३ टक्के घेऊन महाविद्यालयात सर्वप्रथम, कु. पांचाळ सायली बालाजी ८५.८३ टक्के द्वितीय आणि राजगीरवाड कृष्णा शिवाजी ८२.८३ टक्के गुण घेऊन सर्व तृतीय आला आहे. १५ विद्यार्थी ७५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळवले असून ६८ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहे. वाणिज्य शाखेत २६७ परीक्षार्थीपैकी २४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेचा निकाल ९०.२६ टक्के आहे. या शाखेत २६७ परीक्षार्थी पैकी २४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाखेचा निकाल ९०.२६ टक्के आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ५ टक्के अधिक आहे. कु. बैले ज्ञानेश्वरी केशवराव ९०.३३ टक्के गुण प्राप्त करून सर्वप्रथम, पांचाळ प्रणव गोपीनाथ ८५.१७ टक्के गुण प्राप्त करून सर्व द्वितीय आणि बादाडे अतुल तानाजी ८४.५० टक्के गुण प्राप्त करून सर्व तृतीय आला आहे.
कला शाखेत १७० परीक्षार्थीपैकी ११९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेचा निकाल ७० टक्के आहे. कला शाखेत परीक्षेला बसलेल्या १७० विद्यार्थ्यांपैकी ११९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी ७५ टक्के गुण घेणारे ०७ विद्यार्थी, ६० टक्के गुण घेणारे २१ विद्यार्थी आहेत.  कु. शिंदे रूपाली प्रवीण ८७.५० टक्के गुण घेऊन सर्वप्रथम, कु. बनसोडे श्रेया नागसेन ७८.३३ टक्के गुण प्राप्त करून सर्व द्वितीय आणि ७६.८३ टक्के गुण प्राप्त करून तृतीय आली आहे. एच. एस. सी. व्होकेशनल शाखेत ६७ पैकी ५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या शाखेचा निकाल ८०.५९ टक्के आहे. या शाखेतून सय्यद हुजॅफा हसन ७३.५० टक्के गुण घेऊन प्रथम, बुधावळे जगदीश संजय ७१.५० टक्के गुण घेऊन द्वितीय आणि ढोबळे अनिकेत लालाजी ६८.८३ टक्के गुण घेऊन तृतीय आला आहे.
या महाविद्यालयामधून कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतून १०० पैकी १०० गुण घेणारे पाली विषयाचे ०४, दुग्धशास्त्र विषयात २०० पैकी २०० गुण घेणारा ०१, ंिहदी विषयात ९० पेक्षा जास्त गुण घेणारे ०५ विद्यार्थी, भौतिकशास्त्र विषयात ८५ पेक्षा जास्त गुण घेणारे ०२, अर्थशास्त्र विषयात ९० पेक्षा जास्त गुण घेणारे ०२, भूगोल विषयात ९० पेक्षा जास्त गुण घेणारे ०२ विद्यार्थी आहेत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे यांनी केले. या कार्यक्रमांमध्ये  संस्था पदाधिकारी व गुणवंत विद्यार्थी आणि पालकांनी आपली मनोगते व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. घनश्याम ताडेवार यांनी केले तर आभार डॉ. अश्विनी रोडे यांनी मानले. या कार्यक्रमाला कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यवसाय अभ्यासक्रमातील गुणवंत विद्यार्थी पालकांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR