लातूर : प्रतिनिधी
शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्र अंधश्र्द्धा निर्मुलन समितीच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. ‘अंनिस’ जीवनगौरव पुरस्कार, ‘अंनिस’ नरहरी राऊत रंढी-भंजक संघर्षशील कार्यकर्ता पुरस्कार, ‘अंनिस’ कृतिशील आदर्श शिक्षक पुरस्कार तर मधुरजग युवा प्रेरण पुरस्कार जाहीर झाला असून दि. २८ डिसेंबर रोजी ‘अंनिस’च्या राजा अधिवेशनात सदर पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे होणा-या ‘अंनिस’च्या राज्य अधिवशेनात या पुरस्काराचे वितरण होणार असून जीवन गौरव पुरस्काराचे स्वरुप १० हजार रुपये आणि इतर सर्व पुरस्काराचे स्वरुप पाच हजार रुपये, सन्मानपत्र, स्मृती चिन्ह, असे आहे. आपल्याच कार्यकर्त्यांपैकी हटके, संघटनात्मक सातत्यापूर्ण काम करणा-या कार्यकर्त्यांना त्यांच्या विशेष कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन वेगवेगळे पुरस्कार देऊन त्यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समतीच्या वतीने दरवर्षी सहकुटुंब सन्मानीत करण्यात येते. सदर पुरस्कार लेखक जगदीश काबरे, नितीन राऊत, प्राचार्य डॉ. नितीन शिंदे, रेश्मा खाडे यांनी प्रायोजित केले आहेत, अशी माहिती माधव बावगे यांनी दिली.