परभणी : महाराष्ट्र काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या महासचिवपदी येथील रहिवाशी असलेले अब्दुल सत्तार इनामदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या ४० वर्षात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विविध पदाच्या माध्यमातून केलेल्या कामाची पावती म्हणून इनामदार यांची महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडी बद्दल इनामदार यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
परभणी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते ज्यांनी गेल्या ४० वर्षापासून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विविध पदावर काम करून काँग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणाशी निगडित राहून आपले कार्य केले आहे त्यांच्या या सर्व कामाची पावती म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान प्रतापगडी, महाराष्ट्र प्रभारी मोहम्मद अहमद खान पूर्व अध्यक्ष एम एम शेख यांच्या शिफारशीनुसार प्रदेशाध्यक्ष आ.वजाहत मिर्झा यांनी अब्दुल सत्तार इनामदार यांची महाराष्ट्र प्रदेश महासचिवपदी नियुक्ती केली आहे.
या नियुक्ती बद्दल इनामदार यांनी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान प्रतापगडी, महाराष्ट्र प्रभारी मोहम्मद अहमद खान, प्रदेशाध्यक्ष तथा आमदार वजाहत मिर्झा यांचे जाहीर आभार व्यक्त केले आहेत. गेल्या ४० वर्षापासून काँग्रेस पक्षाचे निष्ठावंतपणाने काम केले असून यापुढेही करीत राहील असे इनामदार यांनी सांगितले आहे.