बीड : प्रतिनिधी
महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या परळीच्या धर्मापुरी शाखा व्यवस्थापकाला मारहाण केल्याच्या निषेधार्थ आणि आरोपीवर कडक कारवाई करावी ही मागणी घेऊन अधिकारी, कर्मचारी आक्रमक झाले आहेत. बँक कर्मचा-यांनी आम्हाला पोलिस संरक्षण द्या. धर्मापुरी शाखा स्थलांतरित करा; अशी मागणी केली असून बँकेचे २५० कर्मचारी सामूहिक रजेवर गेले आहेत.
बीडच्या परळी तालुक्यातील धर्मापुरी येथील शाखा व्यवस्थापक भालेकर हे धर्मापुरी परिसरात असणा-या हॉटेलच्या कर्ज प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गेले होते. यादरम्यान त्यांना हॉटेलमालक फड यांच्यासह अन्य दोघांनी जबर मारहाण केली होती. ही घटना १ ऑक्टोबरला घडली होती. कर्मचा-यांना मारहाण केली होती. मात्र या आरोपीला अटक करायचे सोडून त्याला अटकपूर्व जामीन मिळाला आहे. त्यामुळे आता बँक कर्मचारी आक्रमक झाले आहेत.
शाखा व्यवस्थापकाला बोगस कर्जासाठी मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. तर यातील मारहाण करणा-यावर कडक कारवाई न होता, त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे. याच्या निषेधार्थ आणि मारहाण करणा-यांवर कडक कारवाई करावी, धर्मापुरी शाखा स्थलांतरित करण्यात यावी, बँक अधिकारी अन् कर्मचा-यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. आता बँक अधिकारी व कर्मचारी आक्रमक झाले आहेत. जिल्ह्यातील तब्बल २५० बँक कर्मचारी हे सामूहिक रजेवर गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या सर्व शाखा बंद आहेत.