19.3 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर १२ नक्षल्यांना कंठस्नान

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर १२ नक्षल्यांना कंठस्नान

 

गडचिरोली : जिल्ह्यातील जारावंडी क्षेत्रांतर्गत येत असलेल्या छत्तीसगड सीमालगतच्या जंगल परिसरात १७ जुलै रोजी दुपारी २ वाजेताच्या सुमारास जवान-नक्षल्यांत चकमक उडाली. यात १२ नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले. एक उपनिरीक्षक जखमी आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्हा दौऱ्यावर होते, त्यांनी जिल्हा सोडताच घनदाट जंगलात हा थरार घडला.

अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथे स्टील निर्मिती प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व उद्योगमंत्री उदय सामंत हेलिकॉप्टरने आले होते. कार्यक्रम आटोपून त्यांनी जिल्हा सोडल्यानंतर एटापल्ली तालुक्यातील जारावंडी क्षेत्रांतर्गत येत असलेल्या जंगल परिसरात सी ६० पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना इंटला गावाजवळ जंगलात दबा धरून असलेल्या नक्षल्यांनी गोळीबार सुरु केला.

दरम्यान पोलिसांनी देखील नक्षल्यांच्या दिशेने प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. या चकमकीत एक पोलिस उपनिरीक्षक जखमी झाले. त्यांना उपचारासाठी हेलिकॉप्टरने नागपूर येथे हलविण्यात आले असून प्रकृती धोक्याबाहेर आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR