26.2 C
Latur
Friday, April 4, 2025
Homeपरभणीमहावितरणच्या हलगर्जीपणाने १३ वर्षीय बालकाचा मृत्यू

महावितरणच्या हलगर्जीपणाने १३ वर्षीय बालकाचा मृत्यू

परभणी : तालुक्यातील सूर पिंपरी गावात राहणारा ओमकार सुनील गायकवाड (वय १३) हा मंगळवार, दि.२ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता तोंड धुण्यासाठी घराबाहेर पडला. परंतू घरासमोर विद्युत केबलचे काम सुरू असल्याने रस्त्यावर ठेवलेल्या केबलचा धक्का लागल्याने ओमकार गायकवाड याचा जागीच मृत्यू झाला. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला असल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.

परभणी तालुक्यातील सूर पिंपरी या गावात विद्युत केबलचे काम सुरू आहे. त्यामुळे गावात ब-याच ठिकाणी रस्त्यावर विद्युत केबल अंथरण्यात आल्या आहेत. दररोज प्रमाणे मंगळवारी सकाळी ओंकार हा झोपेतून उठल्यानंतर दात घासण्यासाठी घराबाहेर पडला. त्याच्या दारातही विद्युत केबल अंथरण्यात आल्या होत्या. पण त्या विद्युत तारेकडे त्याचे लक्ष गेले नाही आणि तो चालत असताना त्याचा विद्युत तारेला स्पर्श झाला. त्या विद्युत तारांमध्ये करंट सुरू असल्याने ओमकारला जबर शॉक लागून यातच त्याचा जागीच मृत्यू झाला.

ओमकारला शॉक बसल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी धावाधाव करत त्याला परभणी येथील शासकीय रुग्णालयात नेले. परंतू डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. ओमकारच्या मृत्यूनंतर महावितरणच्या हलगर्जीपणा बाबत सूर पिंपरी गावासह परिसरात संताप व्यक्त होत आहे. महावितरणच्या कर्मचा-यांनी कनेक्शन जोडताना हलगर्जीपणा केला असल्याचा आरोप केला जात आहे. घटनेची माहिती समजल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक जायभाये आणि त्यांच्या टीमने घटनास्थळाकडे धाव घेतली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR