काबूल : वृत्तसंस्था
अफगाणिस्तानातील महिला शिक्षणाचे समर्थन करणारे धार्मिक नेते शेख अब्दुल सामी गझनवी यांना तालिबानने तुरुंगात डांबले आहे. तालिबानने मुलींच्या शिक्षणावर घातलेल्या बंदीवर त्यांनी टीका केली. मुलींना शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश बंदी करण्याच्या तालिबानच्या धोरणाचा गझनवीने वारंवार निषेध केला होता. इस्लाममध्ये या बंदीला कोणताही धार्मिक आधार नाही. महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवणे चुकीचे तर आहेच, शिवाय समाजाच्या विकासाला खीळ बसते, असे ते म्हणाले.
तालिबान स्वबळावर तो बरबाद होत आहे.. अफगाणिस्तानातील महिला शिक्षणाच्या समर्थनार्थ आवाज उठवणा-या एका प्रमुख धर्मगुरूला तालिबान प्रशासनाने तुरुंगात डांबले आहे. देशाचे ज्येष्ठ धर्मगुरू मानले जाणारे शेख अब्दुल सामी गजनवी यांनी तालिबान प्रमुखांवर उघडपणे टीका केली. त्यामुळे त्यांना आधी मदरशातून काढून टाकण्यात आले आणि आता तालिबानच्या लष्करी न्यायालयाने ताब्यात घेतले आहे.
तालिबानच्या लष्करी न्यायालयाने कोणतीही जनसुनावणी न घेता ताब्यात घेण्याचे आणि पुढील आदेश येईपर्यंत त्यांना तुरुंगात ठेवण्याचे निर्देश दिले. मात्र, तालिबानने अद्याप या अटकेबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.
शेख गझनवी यांचे अफगाणिस्तानात हजारो अनुयायी आहेत. त्यांच्या अटकेमुळे धार्मिक नेत्यांना प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार नाही का, अशी चर्चा देशात सुरू झाली आहे. गझनवीची लवकरच सुटका करून तालिबानने आपल्या धोरणाचा फेरविचार करावा, असे अनेकांचे मत आहे. यापूर्वी गझनबी यांना काबूलमधील एका मदरशातील शिक्षक पदावरून बडतर्फ करण्यात आले होते.