24.5 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeलातूरमहिलेवर कोयत्याने वार करून खून

महिलेवर कोयत्याने वार करून खून

उदगीर : प्रतिनिधी
उदगीर तालुक्यातील तोंडार पाटी येथील विलास सहकारी साखर कारखाना युनिट २ शेजारील हंगरगा रोडवर असलेल्या विटांच्या घरात राहणा-या सखुबाई तुळशीराम वाघमारे वय ५५ वर्ष या महिलेच्या गळ्यावर कोयत्याने वार करून खून केल्याची घटना दि. २४ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेचे पुर्वी घडली आहे.  या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाख करण्यात आला असून पोलीस मारेक-याचा शोध घेत आहेत.
  घटनेची माहिती उदगीर ग्रामीण पोलिसांना मिळताच उदगीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत,ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले, पोलीस हेडकॉन्स्टेबल शिरसे, नाना शिंदे, राजू घोरपडे, तिडोळे, हे घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळावरून कोयता जप्त करण्यात आला व श्वान पथकास पचारण करण्यात आले होते. या प्रकरणी शोभाबाई अशोक कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना साठी उदगीर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या घटनेमागील मारेक-याचा शोध पोलिस घेत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR