25.3 C
Latur
Thursday, June 27, 2024
Homeलातूरमहेश नवमीनिमित्त मोटारसायकल रॅली

महेश नवमीनिमित्त मोटारसायकल रॅली

लातूर : प्रतिनिधी
माहेश्वरी समाजाच्या वतीने महेश नवमी  वेगळया धाटणीने साजरी करण्यात येत आहे.  यंदा शनिवारी सकाळी मोटार सायकल रॅली काढण्यात आली, परंतु ही रॅली काढताना कोणीही हॉर्न वाजवणार नाही हा संदेश देत आणि याची अंमलबजावणी करत रॅलीतून प्रदूषणमुक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत  माहेश्वरी समाज बांधवांनी एक नवीन आणि कौतुकास्पद आदर्श निर्माण केला आहे.  या रॅलीत पारंपारिक वेशभूषेतील महिला भगिनी आणि पुरुष बांधवांनी हे लातूरकरांचे लक्ष वेधून घेतले होते.
लातूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष सी.ए. प्रकाश कासट, सचिव फुलचंद काबरा, कजगदीश भुतडा, ी विजयकुमार चांडक, राजकुमार पल्लोड, हुकमचंद कलंत्री, बालकिशन मुंदडा, ओमप्रकाश सारडा, जयप्रकाश खटोड, मधुसूदन सोनी, दीपक भुतडा, राजेश मंत्री, गोकुळदास चांडक, राजगोपाल बाहेती, गोविंद कोठारी, पुरुषोत्तम कालिया, रामनिवास धुत, संतोष तोष्णीवाल,  अजय तापडीया, चांदकरण लड्डा,  अशोक जाजू, शाम भट्टड, प्रल्हाद चांडक, ईश्वर बाहेती, रामेश्वर गिल्डा, गगन मालपाणी, दिलीप सोमाणी, नंदकिशोर सोनी, रामेश्वर भराडीया, शामसुंदर सोनी, बजरंग पल्लोड, भारतलाल धुत आदी उपस्थित होते.
माहेश्वरी समाजबांधव-भगिनी आपापल्या मोटारसायकलीवर स्वार होऊन शहरातील जुन्या गावभागात असलेल्या बालाजी मंदिर मागे असलेल्या कृष्णकुंज सोसायटी गेटवर जमले होते. रॅलीच्या सर्वात समोर जिप्सीवर भगवान शंकराची प्रतिमा, त्यानंतर  मोटारसायकल स्वार महिला-युवती आणि मोटारसायकल स्वार युवक- पुरुष हे शिस्तीने उभे झाले.  यावेळी रॅली मार्गावर ठिकठिकाणी संयोजकांकडून लाऊड स्पीकरद्वारे सूचना देण्यात येत होत्या.  ही रॅली जुना रेणापूर नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा गांधी चौक, हनुमान चौक, गंजगोलाई, सराफ लाईन, गुळ मार्केट, शिवनेरी गेट अशी रस्त्यावर प्रत्येकी तीन मोटारसायकलच्या रांगेत  जात गौरी शंकर मंदीर येथे गौरी शंकर यांच्या आरती नंतर रॅलीची सांगता झाली.
या रॅलीत लातूर जिल्हा माहेश्वरी सभा, लातूर जिल्हा माहेश्वरी युवा संघटन, लातूर माहेश्वरी महासभा, बार्शी रोड माहेश्वरी मंडळ, माहेश्वरी युगल्स, लातूर जिल्हा माहेश्वरी महिला संघटन, लातूर शहर माहेश्वरी सभा, गावभाग माहेश्वरी संघटन, भाग्यनगर माहेश्वरी संघटन, अपनी राधाकृष्ण गोशाळा आदीसह शहरातील समाजातील उद्योगपती, व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक  मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR