22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeलातूरमांजरा प्रकल्पातील पाणीसाठा झाला जिवंत

मांजरा प्रकल्पातील पाणीसाठा झाला जिवंत

लातूर : प्रतिनिधी
यंदाचा अर्धा पावसाळा संपत आला तरी लातूरसह बीड, धाराशिव या तीन जिल्ह्यांसाठी महत्वपूर्ण असलेल्या केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणात कालपर्यंत मृत पाणीसाठाच होता. परंतु, मांजरा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी दिवसभर पडलेल्या पावसामुळे मांजरा प्रकल्पातील पाणीसाठा जीवंत झाला आहे. प्रकल्पात ७ क्युमेक्स एवढा येवा झाला असून उपयुक्त पाणीसाठा ०.१५२ दशलक्ष घनमीटर इतका झाला आहे. असे असले तरी मुबलक  उपयुक्त पाणीसाठा होण्यासाठी खुप मोठ्या पावसाची आवश्यकता
आहे.
जुलै महिना संपत अता तरी लातूर जिल्ह्यात विशेषत: मांजरा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वदूर जोरदार पावसाची प्रतीक्षा अद्यापही कायम आहे. अधून-मधून पडणा-या पावसामुळे खरिपाची पिके जोमात असले तरी पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीला आधार देणा-या प्रकल्पांत कालपर्यंत पाण्याची पातळी वाढलेली नव्हती. मोठया प्रकल्पांसह मध्यम, लघू प्रकल्पांतील पाण्याची पातळी वाढलेली नव्हती. परंतू, गेल्या आठ दिवसांपासून पडत असलेल्या पावसामूळे प्रकल्पांमधील पाणीपातळीत वाढ होताना दिसून येत आहे. प्रकल्पांत पाण्याचा येवा हळूहळू वाढत आहे. मात्र जिल्ह्यातील प्रकल्प शंभर टक्के भरण्याकरीता मोठ्या पावसांची गरज नक्कीच आहे. लातूरसह बीड, धाराशिव जिल्ह्यातील २२ पाणीपुरवठा अवलंबुन असलेल्या मांजरा प्रकल्पात कालपर्यंत मृत पाणीसाठा होता.
परंतू, मंगळवारी मांजरा प्रकल्पाच्या पाणलोटे क्षेत्रात झालेल्या सर्वदुर पावसामुळे प्रकल्पात पाण्याचा येवा सुरु झाला आहे. त्यामुळे मांजरा प्रकल्प जीवंत पाणीसाठ्यात आले आहे. येवा तसा कमीच असला तरी प्रकल्प जीवंत पाणीसाठ्यात आले हे महत्वाचे आहे. मांजरा प्रकल्पात ४७.२८२० दशलक्ष घनमीटर एवढा एकुण पाणीसाठा आहे. मृत पाणीसाठा ४७.१३० दशलक्ष घनमीटर आहे. उपयुक्त पाणीसाठा ०.१५२ दशलक्ष घनमीटर तर उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ०.०९ एवढी आहे. निम्न तेरणा प्रकल्पात एकुण पाणीसाठा ५३.६१३० दशलक्ष घनमीटर इतका आहे. २९.९६७ दशलक्ष घनमीटर मृत पाणीसाठा आहे. उपयुक्त पाणीसाठा २३.६४६ दशलक्ष घनमीटर असून उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी २५.९२ एवढी आहे.
जिल्ह्यातील तावरजा, रेणापूर, व्हटी, तिरु, देवर्जन, साकोळ, घरणी व मसलगा हे आठ मध्यम प्रकल्पांत १८.०४१ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी १४.७७ एवढी ओ. १३४ लघू प्रकल्पांत ३४.००४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे.त्याची टक्केवारी १०.७२ असून जिल्ह्यातील एकुण १४४ प्रकल्पांत ७५.८४२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी १०.७६ एवस्ी आहे. या १४४ प्रकल्पांपैकी एक प्रकल्प शंभर टक्के भरलेला आहे. दोन प्रकल्पांत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा, तीन प्रकल्पांत ५१ ते ७५ टक्के, १३ प्रकल्पांत २५ ते ५० टक्के, ३६ प्रकल्पांत २५ टक्क्यांच्या खाली पाणीसाठा आहे. ८२ प्रकल्प जोत्याखाली असून ७ प्रकल्प अद्यापही कोरडे आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR