30.1 C
Latur
Sunday, June 30, 2024
Homeलातूरमाजी मंत्री आमदार अमित देशमुख, नूतन खासदार डॉ. काळगे यांच्यावर  शुभेच्छाचा वर्षाव 

माजी मंत्री आमदार अमित देशमुख, नूतन खासदार डॉ. काळगे यांच्यावर  शुभेच्छाचा वर्षाव 

लातूर : प्रतिनिधी
लातुर लोकसभा मतदार संघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे प्रचंड मताधिकक्याने विजयी झाले. या विजयानंतर राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख तसेच नूतन खासदार डा. शिवाजी काळगे यांच्यावर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक यासह विविध क्षेत्रातील मान्यवराकडून शुभेच्छाचा वर्षाव केला जात आह.
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख तसेच लातूरचे नूतन खासदार डॉ. शिवाजी काळगे यांची कंधार येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिष्टमंडळ, मातंग समाज शिष्टमंडळ लातुर, शहर जिल्हा काँग्रेस सेवादल लातुर यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी बुधवार दि. ५ मे रोजी सायंकाळी बाभळगाव निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली.  या भेटीत नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक आणि या निवडणूकित महाविकास आघाडीला मिळालेले अतुलनीय यश याबद्दल शिष्टमंडळाकडून माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख तसेच नूतन खासदार डॉ. शिवाजी काळगे यांचा सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी माजी मंत्री विनायकराव पाटील, बस्वराज पाटील नागराळकर, रवींद्र काळे, अभय साळुंके, जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, लातुर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, विजय देशमुख, अ‍ॅड.समद पटेल, संतोष देशमुख, अनुप शेळके, हमीद शेख, डॉ. अरविंद भातांब्रे, अजित माने, गणेश एस.आर. देशमुख, प्रीती भोसले, सुनीता अरळीकर, लक्ष्मण कांबळे, अहेमदखान पठाण,  कैलास कांबळे, तबरेज तांबोळी, आसिफ बागवान, इसरार सगरे, व्यंकटेश पुरी, इम्रान सय्यद,अकबर माडजे, महेश काळे, अभिजित इगे, अभिषेक पतंगे, मोहन माने, परमेश्वर जाधव (ता.अध्यक्ष कंधार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), उत्तम चव्हाण, पंडितराव देव कांबळे, जी. एम. पवळे, अनिल ढोबळे, प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर, नागनाथ डोंगरे, नारायण कांबळे, जी. ए. गायकवाड, अ‍ॅड.अंगद गायकवाड, राज क्षीरसागर, अ‍ॅड. संतोष मस्के, दशरथ मस्के, लिंबराज कांबळे, बालाजी साळुंके, अमोल शिंदे, सुभाष सूर्यवंशी, राजा माने, सुरज राजे, गंडाले, इस्माईल शेख तसेच लातुर शहर जिल्हा काँग्रेस सेवादलाचे सुपर्ण जगताप, अ‍ॅड. सुनील गायकवाड,राहुल देशमुख, राजाभाऊ देशमुख, रामराजे देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR