लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरात गुरुवार, दि. ५ जून रोजी सायंकाळी विविध विकास कामांचे भूमिपूजन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि महाराष्ट्र विधानसभा विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. लातूर शहर महानगरपालिकेच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) अंतर्गत ही कामे हाती घेण्यात आली असून, यामुळे शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.
शहरातील एमआयडीसी एक नंबर चौकापर्यंत या रस्त्याचे नुकतेच काम पूर्ण झाले आहे. शहरातील मुख्य रस्त्याला पर्यायी असलेल्या या रस्त्याचे काम होत असल्याने या परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या विकास कामांमुळे लातूरमधील अंतर्गत रस्ते अधिक सुस्थितीत येतील, ज्यामुळे दळणवळण सुधारेल आणि नागरिकांचे जीवनमान अधिक चांगले होईल अशी अपेक्षा आहे. विकास कामांच्या भूमिपूजनानंतर माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शहरातील इतर कार्यक्रमांमध्येही भाग घेतला. त्यांनी साळे गल्ली, मज्जिद रोड परिसरातील शफिक पठाण यांच्या दूल्हे राजा कलेक्शन या दुकानाला आणि हत्तेनगर येथील अक्षय कटारिया यांच्या लक्ष्मी सेल्स या दुकानाला सदिच्छा भेट दिली. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते संपादक बशीर शेख यांच्या अल्पसंख्यांक आवाज साप्ताहिकाने बकरी ईदनिमित्त काढलेल्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, माजी महापौर अॅड. दीपक सुळ, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, सुमित खंडागळे, अभिषेक पतंगे, रत्नदीप अजनीकर, महादेव बुरुरे, बंडू किसवे, पवन सोलंकर, मुकेश राजेमाने, अनंत पाटील, मनोज देशमुख, आनंद वैरागे, बबन देशमुख, डॉ. बालाजी साळुंखे, विकास वाघमारे, प्रा. प्रवीण कांबळे, प्रा. शफी शेख, शैलेश भोसले, बालाजी मुस्कावाड, पृथ्वीराज पवार, जब्बार पठाण, अभिषेक किसवे, कुणाल वागज, आकाश भगत, पवनकुमार गायकवाड, विजय टाकेकर, इस्माईल शेख, व्यंकटेश पुरी, सत्तार शेख, मोहन सुरवसे, अफसर कुरेशी, अरफात खान, महैनुद्दीन शेख, अर्जुन चव्हाण, शिवाजी गायकवाड, सिकंदर पटेल, विष्णुदास धायगुडे, श्रीकांत ठोंबरे, रमाकांत गडदे, गोरोबा लोखंडे, एडवोकेट गोपाळ बुरबुरे, दगडूआप्पा मिटकरी, रईस टाके, किशन शिंदे, विकास माडकर, महेश कोळे, पप्पू अग्रवाल, इनायत सय्यद, गीता गैड, सतीश हलवाई, सुरज राजे, शिवकन्या पिंपळे, मीनाताई सूर्यवंशी, बालाजी झिपरे, नागेश साळुंखे, अमन सय्यद, अविनाश बटेवार, मोहन माने, गिरीश ब्याळे, सचिन बंडापले, चंद्रकांत चिकटे, कैलास कांबळे, अॅड. आतिश चिकटे, आशिफ बागवान, फारूक शेख, युनुस मोमीन, पृथ्वीराज शिरसाट, दीप्ती खंडागळे, गणेश कांबळे, तबरेज तांबोळी, पवन जाधव, युनुस शेख, करीम तांबोळी, अब्दुल्ला शेख, आयुब मणियार, जीवन सुरवसे, सुलेखा कारेपूरकर, युसुफ बाटलीवाला, महेबुब मोमीन, अक्षय बनसोडे, केतन हलवाई आदींसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.